धुळ्यात दुकान फोडून चोरट्यांनी १०३ साड्या केल्या लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:28 PM2019-03-27T17:28:35+5:302019-03-27T17:29:52+5:30
पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल
आॅनलाइन लोकमत
धुळे : चोरट्यांनी गोंदुर रोडवरील साड्यांचे दुकान फोडून तेथून ५५ हजार रूपये किंमतीच्या १०३ साड्या लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवपूर भागातील गोंदूर रोडवर राजेंद्र नंदलाल दर्डा यांचे ललीत साडी नावाचे दुकान आहे. २५ मार्च रोजी रात्री ८.३० ते २६ मार्चच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील ५४ हजार ८२५ रूपये किंमतीच्या १०३ साड्या तसेच दीड हजार रूपये रोख रक्कम लंपास केली. चोरट्यांनी लंपास केलेल्या साड्यांमध्ये कॉटन, सिंथेथिक, पैठणीचा समावेश होता. चोरट्यांनी दुकानातील इतर साहित्यही अस्ताव्यस्त फेकून दिले होते.
याप्रकरणी राजेंद्र नंदलाल दर्डा ९५०, रा. प्लॉट नं.१४,इंद्रप्रस्थ कॉलनी देवपूर) यांनी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक के.एल. सोनवणे करीत आहेत.