धुळे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.२४ टक्के; विभागात धुळे जिल्हा तृतीय स्थानी
By अतुल जोशी | Published: June 2, 2023 01:42 PM2023-06-02T13:42:08+5:302023-06-02T13:42:24+5:30
धुळे जिल्ह्यातून २८ हजार ८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी २७ हजार ७६९ जणांनी परीक्षा दिली.
धुळे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ॲानलाइन जाहीर झाला. यात विभागात धुळे जिल्ह्याचा निकाल ९२.२४ टक्के लागला. विभागात धुळे जिल्हा तृतीयस्थानी आहे.
धुळे जिल्ह्यातून २८ हजार ८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी २७ हजार ७६९ जणांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्यांमधून २५ हजार ६१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष प्राविण्य श्रेणीत ११३९२, प्रथम श्रेणीत ९५१४, द्वितीय श्रेणीत ४१३० तर तृतीय (पास )श्रेणीत ५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. धुळे जिल्ह्यात ६६ केंद्रावर परीक्षा झाली होती. कॅापीमुक्त परीक्षा अभियानामुळे ही परीक्षा चर्चेत होती.