धुळे जिल्हा विकासाचा 11 कलमी कार्यक्रम

By admin | Published: January 9, 2017 12:09 AM2017-01-09T00:09:58+5:302017-01-09T00:09:58+5:30

जिल्हा परिषद : समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनांचा परामर्श, कामांना प्राधान्य

11-point program for development of Dhule district | धुळे जिल्हा विकासाचा 11 कलमी कार्यक्रम

धुळे जिल्हा विकासाचा 11 कलमी कार्यक्रम

Next


धुळे : समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यात 11 कलमी कार्यक्रमामुळे विकासकामांना सुरुवात झाली आह़े महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, फळबाग लागवड, शेततळे, शौचालय, शोषखड्डे, रोपवाटिका अशा कामांचा समावेश करण्यात आला आह़े जिल्हा परिषद प्रशासनाने हा विषय प्रामुख्याने अंजेडय़ावर घेतला आह़े 
अहिल्यादेवी सिंचन विहीर अंतर्गत उद्दिष्ट निश्चित झाले आह़े यात धुळे तालुक्यात 3 हजार 500, साक्री तालुक्यात 1 हजार 969, शिंदखेडा तालुक्यात 2 हजार 500 पैकी 2 हजार 46 आणि शिरपूर तालुक्यात 1 हजार 375 याप्रमाणे अर्जाद्वारे मागणी नोंदविण्यात आली. अमृतकुंड शेततळे अंतर्गत धुळे तालुक्यात 1 हजार 200 पैकी 163, साक्री तालुक्यात 1 हजार 500 पैकी 256, शिंदखेडा तालुक्यात 2 हजारापैकी 236 आणि शिरपूर तालुक्यात 900 पैकी 1 हजार 51 असे एकूण 5 हजार 600 पैकी 626 लाभाथ्र्यानी अर्ज सादर केले आहेत़  भूसंजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग योजनेंतर्गत धुळे तालुक्यात 600 उद्दिष्ट आह़े यात एकाही अर्ज नेलेला नाही़ साक्री तालुक्यात 600 पैकी 197, शिंदखेडा तालुक्यात 1 हजार 500 पैकी 34 आणि शिरपूर तालुक्यात 600 पैकी 18 जणांनी अर्जाद्वारे मागणी नोंदविलेली आह़े भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगअंतर्गत साक्री, धुळे आणि शिरपूर तालुक्यात 600 इतके उद्दिष्ट देण्यात आलेले आह़े यात साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात एकानेही मागणी अर्जाद्वारे नोंदविलेली नाही़ धुळे 600 पैकी 48 आणि शिरपूर तालुक्यात 600 पैकी 20 इतक्या जणांचा समावेश आह़े
कल्पवृक्ष फळबाग लागवड उपक्रमांतर्गत धुळे 1 हजारपैकी 571, साक्री 1 हजार 200 पैकी 431, शिंदखेडा 1 हजार 500 पैकी 439 आणि शिरपूर 500 पैकी 139 जणांनी मागणी नोंदविली आह़े निर्मल शौचालयासाठी धुळे, साक्री आणि शिरपूर तालुक्यात प्रत्येकी 1 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आल़े त्यात धुळ्यातून 837, साक्रीतून 408 आणि शिरपूरमधून 745 जणांचे अर्ज आलेले आहेत़ शिंदखेडय़ात 1 हजार 500 पैकी केवळ 104 जणांनी प्रतिसाद दिलेला आह़े निर्मल शोषखड्डय़ांसाठी धुळे आणि साक्रीतून 900 शिरपूरमधून 700 तर शिंदखेडय़ातून 1 हजार 500 इतके उद्दिष्ट देण्यात आले आहेत़ त्यात धुळ्यातून केवळ 7 जणांनी प्रतिसाद दिला़
उर्वरित तिन्ही तालुक्यातून एकही अर्ज आलेला नाही़ तसेच नंदनवन वृक्ष लागवड, रस्ते, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभिकरण, पशुसंर्वधनविषयक कामे मार्गी लावली जात आहेत़

Web Title: 11-point program for development of Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.