शिंदखेडय़ातील गल्र्स हायस्कूलमधून संगणकाचे 12 मॉनिटर लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 01:12 PM2017-06-14T13:12:14+5:302017-06-14T13:12:14+5:30
कुलूप तोडून चोरटय़ांनी संगणकाचे 12 मॉनिटरसह 60 हजार 500 रूपयांचे साहित्य चोरून नेले
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 14 - शिंदखेडा शहरातील एस़एम़एफ़एस गल्र्स हायस्कूलच्या संगणक कक्षाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी संगणकाचे 12 मॉनिटरसह 60 हजार 500 रूपयांचे साहित्य चोरून नेले आहेत़ ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ अज्ञात चोरटय़ांनी 9 जून रोजी दुपारी 12़ 30 ते 13 जुने रोजी सकाळी 8़20 वाजेदरम्यान संगणक कक्षाचे कुलूप तोडून मॉनिटरसह प्रोजेक्टर, इन्व्हर्टर व दोन कॅमेर चोरून नेल़े याप्रकरणी हायस्कूलचे कर्मचारी भूषण शहा यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े