१२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:37 PM2019-04-10T21:37:28+5:302019-04-10T21:37:45+5:30
बहावलपुरी दिन : शनिवारी निघणार शहरातून शोभायात्रा
धुळे : येथील पूज्य बहावलपुरी पंचायत व बहावलपुरी समाज युवा मंचतर्फे बैसाखी तथा बहावलपुरी दिनानिमित्त १३ एप्रिल रोजी मोटारसायकल रॅली, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ त्यानिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे़
पूज्य बहावलपुरी पंचायत व बहावलपुरी समाज युवा मंचद्वारे बहावलपुरी दिनानिमित्त आठवडाभर बहावलपुरी उत्सव साजरा केले जात आहे़ त्यानिमित्त रविवारी बहावलपुरी उत्सव मेला घेण्यात आला़ १२ एप्रिल रोजी बहावलपुरी समाजातील मुलांची सायकल रर्ली काढली जाणार आहे. तर १३ एप्रिलला शनिवारी बहावलपुरी दिनानिमित्त सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़
१२१ रक्तदात्यांची केले रक्तदान
बहावलपुरी दिनानिमित्त येथील पूज्य बहावलपुरी पंचायत व बहावलपुरी समाज युवा मंचतर्फे २२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ यावेळी बहावलपुरी समाज युवा मंचचे अध्यक्ष ललित तनेजा, बहावलपुरी समाज पंचायतीचे अध्यक्ष किशोर रेलन, हर्षकुमार रेलन, मनीष वधवा, अनिल किंगर, राजेश रेलन, आशिष रेलन, सुशील पोपली, ललित आरुजा आदी उपस्थित होते. यावेळी १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी आरोग्य तपासणी शिबीरात त्वचा, केस तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आली.