धुळे जिल्ह्यातील १२२ ग्रामपंचायतींना स्वमालकीची इमारत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:34 AM2019-07-05T11:34:48+5:302019-07-05T11:35:44+5:30

काही ग्रामपंचायतीचे कार्यालय भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू

122 Gram Panchayats in Dhule district do not own a building | धुळे जिल्ह्यातील १२२ ग्रामपंचायतींना स्वमालकीची इमारत नाही

धुळे जिल्ह्यातील १२२ ग्रामपंचायतींना स्वमालकीची इमारत नाही

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती१२२ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालयच नाहीभाड्याच्या खोलीतून चालतो ग्रामपंचायतीचा कारभार

आॅनलाइन लोकमत
धुळे : ग्रामपंचायतीमार्फतच ग्रामीण भागाचा कारभार सुरू असतो. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायतमार्फतच राबविल्या जातात. परतुं जिल्ह्यातील तब्बल १२२ ग्रामपंचायतींना स्वत:चे छत नाही. बहुतांश ग्रामपंचायतींचा कारभार हा भाड्याच्या खोलीतूनच सुरू आहे.
शासनाने आता ग्रामपंचायतींना अनेक अधिकार बहाल केलेले आहेत. अनेक योजना ग्रामपंचायतीमार्फतच राबविण्यात येतात. विशेष म्हणजे गावाची ग्रामसभाही ग्रामपंचायतीतच होत असते. ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांना बैठका घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयच सोयीचे ठरत असते.
जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती आहेत. यापैकी काही ग्रामपंचायतीच्या इमारती टोलेजंग आहेत. मात्र जिल्ह्यातील तब्बल १२२ ग्रामपंचायतींना स्वमालकीचे छत नाही. स्वमालकीची इमारत नसलेल्या ग्रामपंचायती एकतर अंगणवाड्यांमध्ये असलेल्या जागेत किंवा भाड्याच्या खोलीत भरतात. तेथूनच त्यांचा कारभार सुरू असतो.
मात्र आजच्या स्थितीत किती ग्रामपंचायती भाड्याच्या खोलीत भरतात, त्यांचे भाडे किती याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीच्या इमारती स्वमालकीच्या असणे गरजेचे आहे.
११ गावांना इमारत बांधण्यास मंजुरी
दरम्यान ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी शासनाने मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू केली आहे. या योजनेंंतर्गत जिल्ह्यात १२ ग्रामपंचायतीचे कार्यालय बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १२ लाख रूपये मंजूर झाले आहेत. यात १० लाख ८० हजार शासन तर १ लाख २० हजार रूपये ग्रामपंचायतीला द्यावे लागणार आहे. जिल्ह्यात साक्री तालुक्यात पेटले, सतमाणे, हट्टीबुद्रुक, धुळे तालुक्यातील नेर, होरपाडा, वडगाव, शिंदकेडा तालुक्यातील नेवाडे, दराणे, तामथरे, देगाव, मंदाणे, पढावद येथे ग्रा.प.च. नवीन कार्यालय बांधण्यात येणार आहे.

 

Web Title: 122 Gram Panchayats in Dhule district do not own a building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे