135 कोटी 67 लाखांची धुळे जिल्हा वार्षिक योजना मंजूर

By admin | Published: June 9, 2017 12:40 PM2017-06-09T12:40:39+5:302017-06-09T12:40:39+5:30

नियोजन मंडळाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींकडून मंजुरी

135 crore 67 lakh Dhule district annual plan approved | 135 कोटी 67 लाखांची धुळे जिल्हा वार्षिक योजना मंजूर

135 कोटी 67 लाखांची धुळे जिल्हा वार्षिक योजना मंजूर

Next

 ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.9 - जिल्हा वार्षिक योजनेचा पुढील वर्षाचा नियतव्यय वेळेत खर्च होण्यासाठी प्रशासकीय मान्यतेसह विविध प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी कालबध्द प्रक्रिया राबवावी, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी बैठकीत दिल़े 
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात घेण्यात आली़ त्यावेळी पालकमंत्री भूसे बोलत होत़े  
जिल्हा वार्षिक योजनेत 2017-2018 या वर्षाकरीता 135 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आह़े मंजूर होणारा नियतव्यय वेळेत खर्च होईल, अशी दक्षता प्रत्येक विभाग प्रमुखांनी घ्यावी़ त्यासाठी 15 जुलै 2017 र्पयत सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करायला हवेत़ 20 सप्टेंबर्पयत मान्यतेसह विविध प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबरच्या सुरुवातीला कामांना सुरुवात होईल, असे नियोजन झाले पाहीजे, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या़ 
जिल्हा वार्षिक योजना 2016-17 अंतर्गत आदिवासी उपयोजना व ओटीएसपीसाठी 157 कोटी 25 लाख 44 हजाराचा निधी मंजूर झालेला होता़ त्यापैकी 154 कोटी 90 लाख 85 हजाराचा निधी खर्च झालेला आह़े खर्चाची टक्केवारी 98़50 इतकी आह़े जिल्हा वार्षिक योजना 2016-17 अंतर्गत अनुसुचित जाती उपयोजनांसाठी 25 कोटी 97 लाखांचा निधी मंजूर झाला होता़ त्यापैकी 22 कोटी 36 लाख 1 हजार खर्च झाला असल्याने त्याची टक्केवारी 93़36 इतकी आह़े 2016-17 अंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी 145 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर झाला होता़ त्यापैकी 145 कोटी 53 लाख 28 हजाराचा निधी खर्च झाला़ त्याची टक्केवारी 99़98 इतकी आह़े 

Web Title: 135 crore 67 lakh Dhule district annual plan approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.