शेतकऱ्यांना १३५ कोटींचे कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 09:45 PM2020-07-28T21:45:39+5:302020-07-29T01:01:24+5:30
नाशिक : राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जिल्हा बँकेला दिलेल्या निधीतून बँकेने चालू वर्षासाठी खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी शासनाने ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला आहे. आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. दरम्यान, पीककर्जासाठी शेतकºयांनी सहकारी सोसायट्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जिल्हा बँकेला दिलेल्या निधीतून बँकेने चालू वर्षासाठी खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी शासनाने ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला आहे. आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. दरम्यान, पीककर्जासाठी शेतकºयांनी सहकारी सोसायट्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीककर्ज आढावा बैठक नुकतीच झाली. राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून बँकेला प्राप्त झालेल्या निधीतून जिल्हा बँकेच्या एक लाख तीन हजार थकबाकीदार शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा केली आहे.
शासनाने जिल्हा बँकेला खरीप पीककर्ज वाटपासाठी ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला असून, त्यानुसार बँकेने खरीप पीककर्ज वाटपास सुरुवात केली आहे. जे शेतकरी सभासद पीककर्जासाठी पात्र आहेत, त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत संपर्क साधावा व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच जिल्हा बँकेकडे नियमित कर्ज परतफेड करणाºया व पात्र शेतकºयांना पुरेशा निधीअभावी मागील काळात कर्जवाटप करता आलेले नाही. त्या पात्र शेतकरी सभासदांना कर्ज वितरण करण्याचे आदेश जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले.
जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना-२०२० जाहीर केली असून, सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेने केले आहे. या योजनेतून प्राप्त होणारी वसुलीची रक्कमदेखील बँक कर्जवाटपासाठी करणार असल्याचे म्हटले आहे.सहकारी संस्थांकडून कागदपत्रांची पूर्तताबँकेला महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून निधी प्राप्त झाले असून, खरीप कर्जवाटपाला गती येत आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे पीककर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांना कर्ज देण्यास सुरुवात झाली असून, आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. बँकेस खरीप पीककर्जासाठी शासनाने ठरवून दिलेला लक्ष्यांक पूर्ण करायचा असल्याने पात्र शेतकरी सभासदांनी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन आहेर यांनी केले आहे.पात्र कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या विभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. कर्जवाटपास पात्र व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
- केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा बँक