धुळे जिल्ह्यातील १३५ विस्थापित शिक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:44 AM2018-06-15T11:44:14+5:302018-06-15T11:44:14+5:30
तत्काळ शाळेत हजर होण्याचे आदेश, सात शिक्षकांच्या बदल्या अद्याप बाकी
आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्हा परिषदेच्या १४२ पैकी १३५ विस्थापित शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाालेले असून, त्यांना तत्काळ नवीन शाळेत हजर होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नवीन शाळेत हजर न होणाºया शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, अशीही तंबी देण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषदेच्या ११५३ प्राथमिक शिक्षकांच्या गेल्या महिन्यात बदल्या झाल्या होत्या. मात्र यातील सुरवातीला १०५ शिक्षकांना बदल्या होऊनही शाळा न मिळाल्याने ते विस्थापित झाले होते. नंतर विस्थापितांचा हा आकडा १४२ वर गेला होता.
दरम्यान आपल्याला न्याय मिळावा म्हणून यापैकी काही विस्थापित शिक्षकांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तर खोटी माहिती भरणाºया शिक्षकांच्या जागा विस्थापित शिक्षकांना देण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली होती.
दरम्यान विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया पाचव्या फेरीत राबविण्यात आली. त्यानुसार विस्थापित शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या लॉगीनला टाकण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील १३५ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत. त्यात धुळे तालुका ६८, साक्री तालुका ४५, शिंदखेडा तालुका ४ आणि शिरपूर तालुक्यातील १८ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. बदल्या झाल्यानंतर या शिक्षकांना तातडीने नव्या शाळेत रूजू व्हायचे आहे.
दरम्यान सात विस्थापित शिक्षकांना अद्याप शाळा मिळालेल्या नाहीत. तर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांनाही विस्थापितांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नवीन शाळा देण्यात येणार आहेत.