136 कोटींची योजना अधांतरीच

By admin | Published: September 20, 2015 01:25 AM2015-09-20T01:25:01+5:302015-09-20T01:25:01+5:30

मनपा स्थायी समिती : ‘मनपा’ने योजना वर्ग करण्याचे पत्र दिले, परंतु ‘मजीप्रा’चा अद्याप होकार नाही

136 crore plan | 136 कोटींची योजना अधांतरीच

136 कोटींची योजना अधांतरीच

Next

धुळे : 136 कोटी रुपयांची योजना महापालिकेकडे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे (एमजीपी) याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीतून समोर आली आह़े एमजीपीने योजना वर्ग करून घ्यावी, असे पत्र मनपातर्फे पाठविण्यात आले आहे. परंतु योजना हस्तांतरणाबाबत संबंधितांकडून कोणताही खुलासा आला नसल्याची माहिती अभियंता कैलास शिंदे यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली. यामुळे या पाणी योजनेचे भविष्य अधांतरितच दिसत आह़े हा मुद्दा नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी उपस्थित केला होता़

महापालिकेच्या सभागृहात शनिवारी दुपारी चार वाजता स्थायी समितीची सभा पार पडली़ सभापतीपदी अमोल मासुळे, नगरसचिव मनोज वाघ, उपायुक्त डॉ़प्रदीप पठारे यांच्यासह अमीन पटेल, सोनल शिंदे, शरद वराडे, माधुरी अजळकर, कुमार डियालानी, प्रतिभा चौधरी, नरेंद्र परदेशी, रमेश बोरसे, संदीप पाटोळे, पटेल मोहम्मद अमीन अब्दुल करीम, शेख अरशद अहमद फरीद अहमद, अन्सारी अकील अहमद महम्मद सादीक यांची उपस्थिती होती़

सभेच्या सुरुवातीला नरेंद्र परदेशी यांनी 136 कोटींच्या योजनेंतर्गत चक्करबर्डी येथे उभारण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या बांधकामाचा विषय लावून धरला़ बांधकाम होते, त्यावर आक्षेप घेतल्यावर ते तोडण्यात येते, असे होत असताना महापालिकेच्या अधिका:यांना याची माहिती आहे का? जे नुकसान झाले त्याची भरपाई कोण देणार? याबाबत प्रशासनाने खातरजमा केली की नाही? लाखोंचे नुकसान होत असताना संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार की नाही? असे प्रश्न परदेशी यांनी उपस्थित केल़े यावर अभियंता कैलास शिंदे यांनी सांगितले की, जलकुंभाच्या बांधकामप्रसंगी मनपाला सांगण्यात आले नव्हत़े लक्षात आल्यावर ते थांबविण्यात आल़े याबाबत ठेकेदाराला नोटीसही देण्यात आली आह़े तसेच पाणी योजना मजीप्राकडे वर्ग करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्यानंतर पत्रव्यवहार करण्यात आला आह़े पण त्याबाबत एमजीपीकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नसल्याचे शिंदे यांनी सांगितल़े यामुळे सद्य:स्थितीत या योजनेचे भिजत घोंगडे कायम असल्याचे स्पष्ट आह़े यावर सभापती मासुळे म्हणाले, या योजनेची पाहणी आणि तपासणी समितीमार्फत करण्यात आली आह़े त्या समितीच्या अहवालानंतरच कारवाईचे स्वरूप स्पष्ट होईल़

श्वानदंशाची लस आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना मोफत देत असताना ती सर्वाना त्याच स्वरूपात देण्यात यावी, असा मुद्दा अमीन पटेल यांनी उपस्थित केला़ प्रतिभा चौधरी म्हणाल्या, बीपीएलधारकांचा शोध घेत असताना त्यांची सत्यता पडताळून पाहण्यात यावी़ आरोग्याधिकारी डॉ़मोरे म्हणाले, श्वानदंशाच्या लसचे पैसे घेतल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आह़े यावर सभापती मासुळे यांनी नियमानुसार जे होईल ते करण्याच्या सूचना दिल्या़

शहरातील जामचा मळा भागात नव्याने उभारण्यात येणा:या जलकुंभाची आणि साठवण टाकीच्या कामांसह मनपा जलशुद्धीकरण केंद्रावर लागणारे ब्लिचिंग पावडर असे दोन विषय तहकूब करत पुढच्या बैठकीत विषय सादर करण्याच्या सूचना सभापती मासुळे यांनी दिल्या़ दरम्यान, या वेळी रमेश बोरसे, प्रतिभा चौधरी, अमिन पटेल यांनी कामे होत नसल्याचा आरोप केला़

Web Title: 136 crore plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.