१४ लाखांचा अपहार केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:01 PM2019-07-09T12:01:20+5:302019-07-09T12:01:54+5:30

कापडणे : गावात ७०० शोषखड्डे कागदोपत्री दाखविण्यात आल्याची जिल्हाधिकाºयांकडे तक्रार

14 lakhs of allegations | १४ लाखांचा अपहार केल्याचा आरोप

जिल्हाधिकाºयांना निवेदन दिल्यानंतर कार्यालयाबाहेर निदर्शने करताना कापडणे ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ.

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे गावात ७०० शोषखड्डे करण्यात आल्याचे केवळ कागदोपत्री दाखवून १४ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
८ जुलै रोजी कापडणे ग्रामस्थ व पदाधिकाºयांमार्फत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना तक्रार अर्ज देण्यात आला. 
शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१५-१६ या वर्षाकरिता कापडणे गावासाठी ७०० शोषखड्डे मंजूर झाले होते. त्यापैकी एकही शोषखड्डा गावात झालेला नाही. 
परंतू गावातील सातशे ग्रामस्थांकडे कागदोपत्री शोषखड्डे झाल्याचे दाखविण्यात आले असून सर्व पैसे परस्पर काढून तब्बल १४ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 
विशेष म्हणजे शासकीय कागदपत्रांमध्ये ज्या ग्रामस्थांना लाभार्थी म्हणून दाखवून पैसे काढण्यात आले आहेत, त्या ग्रामस्थांना या योजनेविषयी अजूनही कोणतीच माहिती नाही. 
गावातील १५ अंगणवाडी, ५ जिल्हा परिषद शाळा, ४ माध्यमिक शाळा आदी ठिकाणी देखील शोषखड्डे झाल्याचे दाखविण्यात आले आहेत व त्यांचे अनुदानही काढण्यात आले आहे. 
परंतू प्रत्यक्षात वरील एकाही ठिकाणी शोषखड्डा झालेला नाही. तसेच एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळी नावे दाखवून अनुदान हडप करण्यात आले आहे. या प्रकरणाची,  झालेल्या भ्रष्टाचाराची  वाच्चता होऊ नये म्हणून कापडणे ग्रामपंचायतकडे असलेले महत्त्वाचे दप्तर देखील मुद्दाम गहाळ करण्यात आले आहेत. 
योजना फक्त कागदोपत्री दाखवून सर्वच रक्कम हडप करण्यात आली आहेत. त्यात ठेकेदार, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, रोजगार सेवक, तसेच प्रशासनातील अधिकाºयांनी संगनमत करून अपहार केला आहे. 
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा उपोषण करण्यात येईल. तसेच त्यात अशांतता निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ललित मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल यादवराव पाटील, भटू विश्राम पाटील, सतिष वसंत पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र बाबुराव पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ दगा भिल, योगेश बाबुराव पाटील, नारायण शंकर पाटील, किशोर रोहिदास बोरसे, निलेश धनराज पाटील, बन्सीलाल बाबुराव पाटील आदींनी तक्रारी अर्जाद्वारे दिला आहे.
ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
योजना फक्त कागदावर दाखवून अनुदान हडप करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत कापडणे दप्तरी असलेली कागदपत्रे गहाळ करण्यात आली आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून सर्व प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी अर्जाद्वारे देण्यात आला आहे.

Web Title: 14 lakhs of allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे