दोन वाहनांसह १४ लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:20 PM2019-03-20T22:20:58+5:302019-03-20T22:21:38+5:30

धुळे जिल्ह्यातील कारवाई : होळी-धुळवडसह निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

 14 lakhs of liquor is seized with two vehicles | दोन वाहनांसह १४ लाखांचा मद्यसाठा जप्त

dhule

Next

शिरपूर/धुळे : जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील नवापाडा व धुळे शहरात मिळून वाहनांसह सुमारे १४ लाख रूपयांचा बनावट व अवैध देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागासह शिरपूर ग्रामीण व धुळे शहर पोलिसांनी सोमवारी व मंगळवारी रात्री ही कारवाई केली आहे.
धुळ्यात ११ लाख ३३ हजारांचा
साठा जप्त
धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या संतोषीमाता मंदीर चौकात दोन वाहनांसह ११ लाख ३३ हजार ८२४ रुपये किमतीचा अवैध देशी-विदेशी मद्याचा साठा मंगळवारी रात्री जप्त करण्यात आला. होळी-धुळवड तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या शोधपथकाने ही कारवाई केली.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांना याबाबत माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाचे सहायक फौजदार नानाभाऊ आखाडे व सहकाऱ्यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास संतोषीमाता मंदीर चौकात एम.एच. १८ बीसी ६२४२ व एम.एच. ३९ जे ४९३९ ही दोन वाहने अडविली.
संशय आल्याने या वाहनांची झडती घेतली असता होळी, रंगपंचमी सणासाठी अवैधरीत्या देशी-विदेशी दारू विक्रीसाठी नेत असल्याचे आढळले. या दोन्ही वाहनांसह संपूर्ण मद्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच शेख फरीद अब्दुल लफीक (३३) रा.मोगलाई, मिशन कम्पाऊंडजवळ, साक्रीरोड धुळे व रामदास रविदास चत्रे (३५) रा. इंदिरानगर, वलवाडी, स्टेडियमजवळ या दोघांविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यातत आला. शोध पथकातील सहायक फौजदार हिरालाल बैरागी, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश पाटील, भिका पाटील, पोलीस नाईक मच्छिंद्र पाटील, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, पंकज खैरमोडे, कबिरोद्दीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, कमलेश सुरेश सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूकदारांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले आहे.
नवापाडा येथे २ लाख ६८ हजारांचा साठा जप्त
शिरपूर तालुक्यातील नवापाडा (रोहिणी-भोईटी) येथे सुमारे २ लाख ६८ हजारांचा अवैध व बनावट मद्याचा साठा जप्त करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थापन केलेल्या भरारी पथकाने सोमवारी रात्री ही कारवाई केली.
या विभागाच्या धुळे व जळगाव निरीक्षक व दुय्यम निरीक्षक, सांगवी पोलीस निरीक्षक व त्यांच्या स्टाफने नवापाडा येथे राहत्या घरात केलेल्या या कारवाईत अवैधरीत्या विदेशी मद्य, बियर, परराज्यात निर्मित स्पिरीट व इतर साहित्य जप्त केले. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार झाला. जप्त मुद्देमालाची किंमत २ लाख ६८ हजार २७० रुपये एवढी आहे.
कारवाईवेळी भरारी पथकाचे निरीक्षक आय.एन. वाघ, पवार, दुय्यम निरीक्षक नजन, जळगावचे निरीक्षक कोल्हे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, व्ही.एम. माळी, ब्रम्हाने, संजय कुटे, जवान के.एम. गोसावी, शांतीलाल देवरे, नितीन पाटील, गिरीष पाटील, विजय परदेशी, अमोल पाटील, राहुल सोनवणे, रवींद्र जंजाळे, नंदू ननावरे, वाहन चालक व्ही.बी. नाहीदे, मुकेश पाटील, रघु सोनवणे, सागर देशमुख हे कारवाईत सहभागी झाले. या गुन्ह्याचा तपास धुळे भरारी पथकाचे निरीक्षक आय.एन. वाघ करीत आहेत.

Web Title:  14 lakhs of liquor is seized with two vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे