जिल्ह्यात पंधरा वर्षांत तब्बल १४ हजार एड्सबाधित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:59 PM2018-11-30T22:59:46+5:302018-11-30T23:00:16+5:30

जागतिक एड्स दिन : ५७१ गरोदर महिलांचा समावेश, ११३ जणांचा मृत्यू 

14 thousand AIDS sufferers in the district in 15 years | जिल्ह्यात पंधरा वर्षांत तब्बल १४ हजार एड्सबाधित रूग्ण

जिल्ह्यात पंधरा वर्षांत तब्बल १४ हजार एड्सबाधित रूग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देशात एचआयव्ही एड्स बाधित रूग्णांची संख्या साधारणपणे २६ लाखांपेक्षा अधिक आहे़ देशात शंभर बाधितांमध्ये ६१ पुरूष तर ३९ महिलांचा समावेश असतो़ जिल्ह्यात २००४ ते २०१८ या पंधरावर्षात तब्बल १४ हजार १३६  एड्स बाधितांचे प्रमाण होते़ आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेतल्याने एड्स आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे़
जिल्ह्यात पंधरा वर्षात १४ हजार १३६ रूग्ण एड्स बाधित- जिल्ह्यात २००४ मध्ये २२५४ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती़ त्यात ५४६ पुरूष ३१ गरोधर मातांना एड्सची लागण झाली होती़ २००४ ते २०१८ या एकूण १५ वर्षात   १३ हजार ५६५ पुरूष, ५७१ गरोदरमाता अशी एकूण १४ हजार १३६ एड्स बाधित रूग्णांची नोंद आहे़ 
११३ रूग्णांचा मृत्यू-जिल्ह्यात एड्स लागण झालेल्या रूग्णापैकी २०१७ ते २०१८ या कालावधीत ५० हजार ३३४ तर ५४ हजार ८५८ महिलांची तपासणी करण्यात आली होती़ त्यात  चालू वर्षी ३४२ पुरूष तर १० गरोदर माता बाधित  आहे़ त्यात आतापर्यंत ११३ एड्स बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे़ 
७ वर्षांत एड्सवर नियंत्रण- जिल्ह्यात पंधरा वर्षात एड्स आजाराची स्थिती चिंताजनक होती़  २००७ मध्ये २०९१  रू्ग्णाला एड्सची लागण झाली़ एड्स स्थितीबाबत आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेऊन जिल्हारूग्णालय, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केद्रासह  ११ एकात्मिक सल्ला केद्र व सामाजिक संस्थेच्या मदत घेऊन शहरी व ग्रामीण भागात एड्स आजारावर मागदर्शन, उपचार, मोफत सरकारी औषधी, रक्त नमुणे तपासणी, शाळा, महाविद्यालयात चर्चासत्र, पथनाट्य, स्पर्धा, रॅली, प्रबोधन भर दिला आहे़ एड्सची लागण रूग्णांची टक्केवारी २४.२२ टक्यावरून ०.६८ टक्यावर आल्याने जिल्ह्यात एड्सवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.  
जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्यावतीने जिल्ह्यात एड्सबाधित रू्ग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा रूग्णालयासह ग्रामीण आरोग्य विभागातून औषधी व मार्गदर्शन केले जाते़ बाधित रूग्णांनी वेळवेळी औषध उपचार व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच गरोधर मातांनी तपासणी करावी  काही वर्षापासून जिल्ह्यात एड्स आजारावर नियंत्रण मिळाले आहे़                       
             -डॉ़शितल पाटील
जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी,

Web Title: 14 thousand AIDS sufferers in the district in 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे