धुळे शहराची १४ वर्षानंतर हद्दवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:42 AM2018-01-11T11:42:19+5:302018-01-11T11:44:22+5:30

अधिसुचना जाहीर : ४ गावांचा पूर्ण तर ७ गावांचा अंशत: समावेश

14 years after Dhule city | धुळे शहराची १४ वर्षानंतर हद्दवाढ

धुळे शहराची १४ वर्षानंतर हद्दवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देहद्दवाढीमुळे जिल्हा परिषदेचे वलवाडी येथील सदस्य शांताराम रामदास राजपूत (भिल) व वलवाडीचेच पंचायत समिती सदस्य नरेश रूपला चौधरी आणि रंजना वाल्मिक वाघ यांचे सदस्य पद रद्द झाल्याचा शासनाच्या अधिसुचनेत स्पष्ट उल्लेख आहे.- धुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ ४६़४६ चौकिमी इतके होते़ मात्र हद्दवाढीनंतर ते १०१़०८ चौकिमी इतके झालेहद्दवाढ जाहीर झाली असली तरी आता वाढीव भागाचे ले-आऊट घेऊन त्यांचा शहर विकास आराखड्यात समावेश करण्याची प्रक्रिया सुरू होणार 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  :  धुळे शहराची पहिली हद्दवाढ अखेर लागू झाली असून ५ जानेवारीच्या तारखेने तयार झालेली अधिसूचना मनपाला बुधवारी प्राप्त झाली़ तत्पूर्वी शहराचे आमदार अनिल गोटे यांनी सोशल मिडीयावर अधिसूचना टाकत शहर हद्दवाढ झाल्याचे जाहीर केले़ ४ गावे पूर्ण तर ७ गावांचा अंशत: समावेश हद्दवाढीत झाला आहे़
धुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ ४६़४६ चौकिमी इतके होते़ मात्र हद्दवाढीनंतर ते १०१़०८ चौकिमी इतके झाले असून दुपटीपेक्षा अधिक क्षेत्र मनपा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे़ वलवाडी, महिंदळे, बाळापूर व पिंपरी या चार गावांचा पूर्णत: तर अन्य भोकर, नकाणे, अवधान, चितोड, नगाव, वरखेडी, मोराणे या गावांचा अंशत: समावेश करण्यात आला आहे़  तर चार पूर्णत: समावेश असलेल्या ग्रामपंचायतींमधील पदाधिकाºयांची पदे आता अस्तित्वात राहिली नसून ते धुळेकर नागरिक झाल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले़  दरम्यान, हद्दवाढ जाहीर झाली असली तरी आता वाढीव भागाचे ले-आऊट घेऊन त्यांचा शहर विकास आराखड्यात समावेश करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले

Web Title: 14 years after Dhule city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.