बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीला १४ वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 05:54 AM2018-07-13T05:54:09+5:302018-07-13T05:54:18+5:30
अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने नराधम आरोपीस गुरुवारी १४ वर्षे कारावास आणि ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
धुळे : अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने नराधम आरोपीस गुरुवारी १४ वर्षे कारावास आणि ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने शिक्षा भोगावी लागणार आहे.
आरोपी गोविंद नारायण घुले (४३) पीडितेच्या वडिलांसोबत क्रेन सर्व्हिसचे काम करीत होता. १ जुलै २०१३ रोजी त्याने दुचाकीवरून बालिकेला गावाच्या शिवारात नेऊन नाल्यात तिच्यावर अत्याचार केला. या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सृष्टी नीळकंठ यांच्या न्यायालयात झाले. त्यात पीडितेचा जबाब, वैद्यकीय अधिकारी मिलिंद पवार आणि प्र्रत्यक्षदर्शी दुरसिंग गना बारेला यांसह तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. निकालानंतर आरोपी घुले याने गोंधळ घातला.