खताच्या गोण्या धुताना तोल गेला, 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
By देवेंद्र पाठक | Published: September 2, 2022 11:51 PM2022-09-02T23:51:39+5:302022-09-02T23:52:07+5:30
धुळे तालुक्यातील फागणे गावानजीक एका नाल्यात शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नरेंद्र पाटील हा मुलगा खताच्या गोण्या धूत होता
देवेंद्र पाठक
धुळे : तालुक्यातील फागणे शिवारात असलेल्या नाल्यात बुडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दवाखान्यात दाखल केले असता डाॅक्टरांनी मयत घोषित केले. नरेंद्र त्र्यंबक पाटील (१६) असे मयत मुलाचे नाव आहे.
धुळे तालुक्यातील फागणे गावानजीक एका नाल्यात शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नरेंद्र पाटील हा मुलगा खताच्या गोण्या धूत होता. अचानक त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी त्यावेळी कोणीही नसल्याने तो बुडाला. ही घटना लक्षात येताच त्याचा पाण्यात शोध घेण्यात आला. त्याला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. खासगी वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याला तपासून मयत घोषित केले. धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.