१६७ अहवाल पॉझिटिव्ह, चार रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:00 PM2020-08-17T22:00:49+5:302020-08-17T22:01:10+5:30

जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ५७८६

167 reports positive, four patients die | १६७ अहवाल पॉझिटिव्ह, चार रूग्णांचा मृत्यू

१६७ अहवाल पॉझिटिव्ह, चार रूग्णांचा मृत्यू

Next

धुळे - जिल्ह्यातील आणखी १६७ रूग्णांचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. तसेच चार रूग्णांचा मृत्यू झाला.
मृतांमंध्ये धुळे शहरातील वडजाई रोड व तालुक्यातील तिखी येथील महिला तसेच शिरपूर शहरातील दोन पुरूषांचा समावेश आहे. दरम्यान, १४ आॅगस्ट रोजी पाच रूग्णांचा मृत्यू झाला होता. एकूण मृतांमध्ये त्यांचा समावेश जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री केला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १७७ इतकी झाली आहे.
सोमवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ८७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. धुळे तालुक्यातील नऊ, शिरपूर तालुक्यातील १६, शिंदखेडा तालुक्यातील ५२ व साक्री तालुक्यातील तीन रूग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ५७८६ इतकी झाली आहे.

धुळे शहर- २८७८
ग्रामीण - २९०८
एकूण - ५७८६

कोरोनामुक्त - ३९२९
उपचार सुरू - १६८०

मृत्यू - महानगर - ८६
ग्रामीण - ९१
एकूण - १७७

Web Title: 167 reports positive, four patients die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे