कामगारांचे थकीत १८ कोटी अद्याप मिळाले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:34 AM2021-05-01T04:34:11+5:302021-05-01T04:34:11+5:30

१९७० च्या दशकात पांझरा कान साखर कारखाना चालला. ऊस, पाणी, मनुष्यबळ याची मुबलकता असल्याने, काही काळातच हा कारखाना भरभराटीस ...

18 crore due to exhaustion of workers has not been received yet | कामगारांचे थकीत १८ कोटी अद्याप मिळाले नाहीत

कामगारांचे थकीत १८ कोटी अद्याप मिळाले नाहीत

Next

१९७० च्या दशकात पांझरा कान साखर कारखाना चालला. ऊस, पाणी, मनुष्यबळ याची मुबलकता असल्याने, काही काळातच हा कारखाना भरभराटीस आला होता. या कारखान्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला होता. १९९६ पर्यंत हा कारखाना चांगल्या स्थितीत चालला. मात्र चुकीच्या व्यवस्थापनामुळे २६ जानेवारी २००१ला शेतकऱ्यांची सत्ता असलेला कारखाना बंद पडला. त्यामुळे शेतकऱ्यांसह कामगारही पोरके झाले. कारखाना बंद पडला, तेव्हा या कारखान्यात जवळपास ७५० कामगार कामावर होते. दरम्यान, १९९६ ते २००२ या कालावधीचा कामगारांना पगारच मिळालेला नाही. कामगारांचा हक्काचा पैसा मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न मांडला गेला. मात्र कामगारांना अद्याप त्यांचा पगार मिळाला नाही. कारखान्याकडून कामगारांचे १८ कोटी रुपये अद्यापही मिळालेले नाहीत.

पगार मिळेल या आशेवर कामगार होते; मात्र ७५० पैकी सुमारे ४०० कामगार आतापर्यंत मृत झालेले आहेत, तर पाचजणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आज जे कामगार हयात आहेत, त्याची परिस्थिती अतिशय हलाकीची आहे. त्यामुळे या कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळावा, अशी मागणी होत आहे. जाेपर्यंत कारखान्याची विक्री होत नाही, तापर्यंत कामगारांचे पगार मिळणे अवघडच आहे.

कारखाना विक्रीचे दोन प्रयत्न अयशस्वी

n हा कारखाना विक्रीचा आतापर्यंत दोनवेळा प्रयत्न झाला. कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता, ऊस उत्पादक व कामगार यांचे आग्रही भूमिका बघता मे. सित सन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली या कंपनीने भाडेतत्त्वावर चालविण्याचा करार केला होता. परंतु शिखर बँकेने त्यावेळेस अडेलतट्टूची भूमिका घेतल्याने हा कारखाना सुरू होऊ शकला नाही. त्यावेळेस जर कारखाना सुरू झाला असता, तर शिखर बँकेचे कर्जही फिटले असते व तालुका सुजलाम सुफलाम झाला असता.

n त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याने हा कारखाना १२ कोटी ५१ लाख रुपयांमध्ये विकत घेतला होता. परंतु अटी-शर्तीच्या विसंगतीमुळे साखर आयुक्त, पुणे यांनी हरकत घेतल्याने तोही प्रयत्न यशस्वी झाला.

Web Title: 18 crore due to exhaustion of workers has not been received yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.