१८ गाव योजना बंदमुळे त्रासात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 10:12 PM2019-07-07T22:12:52+5:302019-07-07T22:13:34+5:30

साधनांची दुरवस्था : गावासाठी पाणी योजना मंजूर झाल्यास केंद्र उपयोगात आणणे शक्य

18 gram scheme closed due to the problem | १८ गाव योजना बंदमुळे त्रासात भर

dhule

googlenewsNext

सोनगीर : धुळे व शिंदखेडा तालुक्यातील १८ गावासाठी वाघाडी ता. शिंदखेडा येथे असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ची ७.० द.ल क्षमता असलेले जलशुद्धीकरण केंद्र व सोनगीर सह १८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अशुद्ध पाणी व सुमारे २० लाख रुपय थकीत वीज बिलापोटी गेल्या पाच ते सहा वर्षापासून बंद आहे. त्यामुळे येथील पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली.
योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील महत्वपूर्ण विभागासह साधनांची पार दुरवस्था झाली असून योजना गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी उपयोगाची नाही. मात्र तापी नदीवरून पाणी आणणारी मोठी योजना गावासाठी मंजूर झाल्यास तेथील जलशुद्धीकरण केंद्र मात्र उपयोगात आणले जाऊ शकते.
२००६ साली धुळे तालुक्यातील तीन व शिंदखेडा तालुक्यातील १५ अशा एकूण १८ गावांसाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चाची ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आणली. सुरुवातीचा काही काळ ही योजना अनुदान व पाणीपट्टीच्या रकमेवर सुरळीत चालवली गेली. त्यानंतर मात्र शासनाकडून योजनांचे अनुदानाचे प्रमाण कमी होत गेल्याने योजना चालवणे अवघड जाऊ लागले. योजना चालविण्यासाठी सुमारे दोन ते अडीच लाख रुपये मासिक खर्च यायचा. त्यातून वीजबिल, कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्च असायचा. पण फक्त पाणीपट्टी कर वसुलीच्या आधारावर ही योजना चालवणे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणात वीजबिल थकायचे. तर कधी धरणातील अति अशुद्ध पाण्यामुळे योजना अधूनमधून बंद पडत असे. पुढे वारंवार हे होत राहिले.
१८ गावांपैकी सोनगीर गाव मोठे
सोनगीरसह योजनेतील १८ गावांची एकूण लोकसंख्या सुमारे ७० ते ७५ हजारांच्या जवळपास आहे. त्यात सोनगीर हे सुमारे २५ ते ३० हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेले सर्वात मोठे गाव आहे. या मुळे योजनेची गरज सर्वाधिक सोनगीर गावासाठी असायची
काही गावांनी केली पर्यायी व्यवस्था
वेळोवेळी योजना बंद पडत असल्याने तसेच धरनातील पाण्यावर कितीही शुद्धीकरण ची प्रक्रिया करून देखील पिण्या योग्य नसल्याने अठरा पैकी काही गावांनी कंटाळू आपल्या गावासाठी स्वतंत्र पाणी व्यवस्था करून घेतली तर काही गावे आज देखील पाणी टंचाई ने हैराण आहेत.
योजनेतील विजपंप, पाईप लाईन, विजसंच तसेच इतर साधनांची आता पार दुरवस्था झालेली दिसून येते म्हणजे शासनाची कोट्यवधी रुपय खचार्ची योजना अशुद्ध पाणी व थकीत बीला पोटी दुर्लक्षित आहे
शिंदखेडा तालुक्यातील सोनवद धरणावरून ७५ एचपीच्या मोटारीने वाघाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात एका तासाला सुमारे दोन लाख लिटर पाणीपाईप लाईनद्वारे आणण्याची व्यवस्था आहे. सोनगीर एमबीआर साठी जलशुद्धीकरण केंद्रामथून ५० एचपी मोटारीने एका तासाला सुमारे ८० हजार लिटर पाणी टाकण्याची व्यवस्था आहे तसेच बाभळे एमबिआर साठी ७५ एचपी च्या मोटारीने एका तासाला सुमारे एक लाख लिटर पाणी टाकण्याची व्यवस्था आहे. ही योजना शिंदखेडा तालुक्यातील सोनवद धरणावर अवलंबून आहे या योजनेचा धुळे तालुक्यातील सोनगीर, दापुरा, दापुरी व शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी, वाघाडी बु., बाभळे, वालखेडा, माळीच, गोराणे, विटाई, सार्वे, वायपूर, खलाणे, चांदगड, डाबली, धांदरणे, कलमाडी, पिंपरखेडा अशी धुळे तालुक्यातील तीन व शिंदखेडा तालुक्यातील १५ गावांना १०० चौरस कि.मी. विस्तारलेल्या पाईपलाईनद्वारे पुरवठा केला जायचा. मात्र ती आता जीर्ण झाली आहे.

Web Title: 18 gram scheme closed due to the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे