बस उलटून 18 प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 12:05 AM2017-01-21T00:05:37+5:302017-01-21T00:05:37+5:30

धुळे : अमळनेरहून लासलगावकडे जाणारी एस.टी. महामंडळाची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून अपघात झाला. त्यात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले.

18 passengers were injured in the accident | बस उलटून 18 प्रवासी जखमी

बस उलटून 18 प्रवासी जखमी

Next


धुळे : अमळनेरहून लासलगावकडे जाणारी एस.टी. महामंडळाची बस  चालकाचे नियंत्रण सुटल्याने  उलटून अपघात झाला. त्यात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वणी ते फागणे रस्त्यावर हा अपघात झाला़
जखमींमध्ये विमलबाई पाटील (65), बबली पाटील (4), छकुली  पाटील (14) तिघे रा. गंगापुरी ता.धरणगाव, छाया कचवे (30), सागर कचवे (5), दीपक कचवे (35) रा.नरवाड ता.धुळे, लीलावती चौधरी (65), रवींद्र चौधरी (24) रा.अमळनेर, मोहिनी पाटील (25), कृष्णा पाटील (5) रा.टाकरखेडा ता.अमळनेर, कविता देसले, सुमित देसले रा़ विंचूर ता.धुळे, प्रभात निकम (84) रा.आंबोडा ता.धुळे, संदीप मोरे (33) रा.नकाणे, ता.धुळे, बेबा पिंजारी (40) रा.दहिवद ता.अमळनेर, प्रशांत पाटील (23) रा. अजनाड ता.शिरपूर, शबाना शेख अमीन (30),विवेक चौधरी (2) रा.बहादूरपूर रोड मालेगांव ता.अमळनेर यांचा समावेश आहे.
अवैध दारू विक्रीबाबत माहिती द्यावी : एसपी
धुळे : जिल्ह्यात होणा:या अवैध दारू विक्री आणि शस्त्र बाळगणा:यांबद्दल नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक चैतन्या एस यांनी एका निवेदनाद्वारे केले आह़े नागरिकांसाठी हेल्पलाईन मोबाइल क्रमांक 9404153519 यावर व्हॉट्सअप सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आह़े

Web Title: 18 passengers were injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.