इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनातून १९ उपकरणांची राज्यस्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:53 AM2018-02-10T11:53:32+5:302018-02-10T11:54:46+5:30
धुळे येथे सुरू होते तीन दिवस, विज्ञान प्रदर्शन, विजेत्यांचा केला सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : इन्स्पायर अवॉर्ड विभागीय विज्ञान प्रदर्शनातून १९ उपकरणांची निवड राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आलेली आहे. यात धुळ्याचे ९, जळगावचे ६ व नंदुरबार जिल्ह्यातील ४ उपकरणांचा समावेश आहे.
या विज्ञान प्रदर्शनात १८६ उपकरणे मांडण्यात आली होती. त्यात धुळ्याचे ८६, जळगावचे ६० व नंदुरबार जिल्ह्यातील ४० उपकरणांचा समावेश होता.
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर व शिक्षण विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या विज्ञान प्रदर्शनाचा शुक्रवारी समारोप झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले होते. व्यासपीठावर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी डी.बी.पाटील, महेंद्र सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय बोरसे आदी होते.
या वेळी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुस्तक व गुलाबपुष्प मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
विभागीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनातून राज्यस्तरावर निवड झालेले विद्यार्थी, कंसात गाव व उपकरणाचे नाव असे-
धुळे जिल्हा-रूपेश प्रदीप शिंदे ( मोहाडी धुळे-कचरा निर्मूलनाची आधुनिक पद्धत), दिग्विजय जयवंत भामरे (देवपूर, धुळे- सौर सायकल), सुभाष दिनेश पाटील (धुळे- आधुनिक विकसनशील शेती), अवैस साजीत शेख (साक्री- आधुनिक पार्किंग), संध्या किरण नंदन (साक्री- रस्त्यावरील कचरा सुव्यवस्थापन), पल्लवी विजय नेरकर (साक्री- कचरा व्यवस्थापन व जलाशय संरक्षण), देवेश संजय सोनवणे (भालणे, ता.साक्री- इलेक्ट्रिसिटी जनरेशन), रितीक सुनील जैन (शिंदखेडा- वेस्ट मॅनेजमेंट इन रेल्वे), साक्षी शशिकांत पवार (शिंदखेडा- आॅटो सेल्फ क्लिनिंग टॉयलेट).
जळगाव जिल्हा- अमृता सुधाकर पाटील (वरणगाव- आधुनिक स्प्रे पंप), शुभम नावरे (उंबरखेड), मेघना दिलीप कुळकर्णी (मेहुणबारे, नदीची स्वच्छता), सोहम सुनील राठी (एरंडोल- सिंचनाची आधुनिक पद्धत), वेदांत नितीन महाजन (रावेर), आदित्य सुनील देशमुख (यावल, सौर रेल्वे).
नंदुरबार जिल्हा- आर्या दिनेश पाटील (नंदुरबार- हायटेक फॅन), कशहिती श्यामसिंग वळवी (नंदुबार), गणेशराज निंबा पाटील (विखरण), क्रितिका संदीप वसावे.