धुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागात १९६ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:04 PM2020-09-07T12:04:48+5:302020-09-07T12:05:44+5:30
सर्वाधिक साक्री तालुक्यात तर सर्वात कमी रिक्तपदे शिंदखेडा तालुक्यात
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १९६ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक पदवीधर शिक्षकांची ७२ त्याखालोखाल उपशिक्षकांची ४४ पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
ॅजिल्हा परिषदेत असलेल्या विविध अस्थापनांपैकी शिक्षण विभाग हा महत्वाचा विभाग आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात ११०३ जिल्हा परिषदांच्या शाळा असून, गेल्यावर्षापर्यंत त्यात विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे या सर्व शाळा डिजीटल आहेत.
शाळा, विद्यार्थी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असतांना मात्र शिक्षकांसह विविध पदांची कमतरता दिसून येत आहे.
जिल्ह्यात उपशिक्षकांची ४४, पदवीधर शिक्षकांची ७२,पदोन्नती मुख्याध्यापकांची ४३, केंद्र प्रमुखांची २७, विस्तार अधिकाऱ्यांची १० असे एकूण १९८ पदे रिक्त आहेत.
साक्री तालुक्यात रिक्त पदांची संख्या जास्त
जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये साक्री तालुक्यात रिक्त पदांची संख्या जास्त आहे. या तालुक्यात शिक्षण विभागातील ६४ पदे रिक्त आहेत. यात उपशिक्षक १४, पदवीधर शिीक २५, पदोन्नती मुख्याध्यापक ९, केंद्र प्रमुखांची ११ पदांचा समावेश आहे. त्या खालोखाल धुळे तालुक्यात रिक्त पदे आहेत. या तालुक्यात ५२ पदे रिक्त आहे. शिरपूरमध्ये ४२ व शिंदखेडा तालुक्यात ३८ पदे रिक्त आहेत.