पळासनेर येथे एकाकडून मशिनगनसह २० पिस्टल, २८० जीवंत काडतूस जप्त
By अतुल जोशी | Published: July 12, 2023 06:30 PM2023-07-12T18:30:56+5:302023-07-12T18:31:15+5:30
हा शस्त्रसाठी कोणाला विक्री केला जाणार हाेता याचा तपास पोलिस करीत आहे.
शिरपूर (धुळे) : ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे शस्त्रसाठा विक्रीसाठी आलेल्या एकास पकडून त्याच्याजवळून एक गावठी मशिनगनसह २० पिस्टल, २८० जीवंत काडतूस असा शस्त्रसाठा जप्त केला.ही कारवाई ११ जुलै २३ रोजी करण्यात आली. सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग (वय २७, रा. उमर्टी, ता. वरला, जि.बडवाणी) असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ठाणे शहरातील वाळगे इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल एका गुन्ह्यातील आरोपी सुरजितसिंग उर्फ माजा हा शस्त्रसाठा विक्रीसाठी धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक ५चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा घटक ५, वागळे ठाणे येथील पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधार्थ पळासनेर येथे दाखल झाले. सुरजीतसिंग हा २० गावठी बनावटीचे पिस्टल, गावठी बनावटीची एक मशिनगन, दोन मॅग्झीन,व २८० काडतुसासह विक्रीसाठी आला असता, पोलिसांनी त्याला ११ जुल २३ रोजी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तपास गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे हे करीत आहे. हा शस्त्रसाठी कोणाला विक्री केला जाणार हाेता याचा तपास पोलिस करीत आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश महाजन, उपनिरीक्षक सुनील अहिरे, संदीप शिंदे, रोहिदास रावते, सुनीलनिकम, शशिकांत नागपुरे, विजय पाटील, माधव वाघचौरे, सुनील रावते, विजय काटकर, अजय साबळे, सुनीता गीते, मिनाक.