बोराडीत दोन दिवसात 214 मि.ली. पाऊस

By admin | Published: June 9, 2017 05:04 PM2017-06-09T17:04:04+5:302017-06-09T17:04:04+5:30

अतिवृष्टीची नोंद : शेतक:यांचे नुकसान

214 ml in Boradi in two days Rain | बोराडीत दोन दिवसात 214 मि.ली. पाऊस

बोराडीत दोन दिवसात 214 मि.ली. पाऊस

Next

ऑनलाईन लोकमत

शिरपूर,दि.9 - तालुक्यातील बोराडी येथे सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बोराडीत दोन दिवसात 214 मि.ली. पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे येथील शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून तेथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.  
धुळे जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे बुधवारी व गुरुवारी अतिवृष्टी झाल्याची नोंद शिरपूर येथील पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे. अतिवृष्टीमुळे बोराडी येथील शेतक:यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील सांगवी येथेही बुधवारी अतिवृष्टी झाल्याची नोंद पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे. अतिवृष्टीमुळे सांगवी-बोराडी रस्त्यावरील बंधारा फुटलेला असून पावसाचे पाणी शेतांमध्ये शिरल्यामुळे हाताशी आलेली पिके वाहून गेली आहे. तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे. 
शिरपूर तालुक्यातील पर्जन्यमापक केंद्रात बोराडी येथे  122 मिमी तर सांगवी 115 मि. मी. पावसाची नोंद 8 रोजी झाली आहे. 9 रोजी बोराडी येथे 92 मि.मी. पाऊस झाला आहे. 
सांगवी, बोराडी, पळासनेर अंधारात 
दमदार पावसामुळे शिरपूर तालुक्यातील सांगवी, बोराडी, पळासनेर भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यापूर्वी सांगवी व पळासनेर भागातील वीज पुरवठा सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस पावसामुळे खंडित होता. गुरुवारी सकाळी या भागात वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला. परंतु, गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा या भागातील वीज गूल झाली आहे. 

Web Title: 214 ml in Boradi in two days Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.