धुळ्यात २३ लाखांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 06:01 PM2018-12-03T18:01:43+5:302018-12-03T18:03:43+5:30
एका चारचाकी वाहनातून नेली जाणारी सुमारे २३ लाखांची रोकड पकडण्यात आल्याची घटना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान शिवारात सोमवारी पहाटे घडली.
धुळे : एका चारचाकी वाहनातून नेली जाणारी सुमारे २३ लाखांची रोकड पकडण्यात आल्याची घटना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान शिवारात सोमवारी पहाटे घडली. यात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महानगरपालिकेची निवडणूक सुरु असताना शहरानजीकच एवढी मोठी रक्कम सापडल्याने चर्चांना उधाण आले आहे़ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पथकासमवेत महामार्गावर गस्तीवर होते़ त्याचवेळी मुंबईकडे जाणारी (क्र. एमपी ०९ सीआर ६०९९) कार अडविण्यात आली़ वाहनाची तपासणी केली असता आसनाखाली २३ लाखांची रोकड आढळून आली़ तात्काळ ही रोकड जप्त करण्यात आली़ त्यानंतर या कारमधील दोघांना ताब्यात घेण्यात आले़ यातील एक जण मुंबई तर दुसरा इंदूर येथील रहिवासी आहे़