धुळे जिल्ह्यात ११वीसाठी २४ हजार ८४० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:42 AM2019-06-20T11:42:44+5:302019-06-20T11:43:42+5:30

विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे कल, शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रिया

24 thousand 840 seats in Dhule district for 11th | धुळे जिल्ह्यात ११वीसाठी २४ हजार ८४० जागा

धुळे जिल्ह्यात ११वीसाठी २४ हजार ८४० जागा

Next
ठळक मुद्देअनुदानित तुकड्यांमध्ये १८ हजार ९६० जागाकला शाखेच्या १२ हजार ३२० तर विज्ञान शाखेच्या ४ हजार ८४० जागा प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार


आॅनलाइन लोकमत
धुळे : नऊ दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झालेले असून, विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात सर्व जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या एकूण २४ हजार ८४० जागा आहेत. यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात १८ हजार ९६० तर खाजगी, विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार ८८० जागा आहेत. विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे आहे. दरम्यान २१ पासून महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८ जून जाहीर झाला. परीक्षेसाठी २८ हजार ८८२ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २८ हजार ३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २१ हजार ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी ७७.११ एवढी होती.
जिल्ह्यात यंदा आॅफलाइन पद्धतीनेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात ११वीसाठी २२० अनुदानित तुकड्यांमध्ये तब्बल १८ हजार ९६० जागा आहेत. त्यात १२ हजार ३२० जागा कला शाखेच्या, ४ हजार ८४० जागा विज्ञान शाखेच्या, ७६० जागा वाणिज्य शाखेच्या आहेत. याशिवाय १ हजार ४० जागा संयुक्त शाखेच्या आहेत.
त्याचप्रमाणे ७१ विनाअनुदानित तुकड्यांमध्ये एकूण ५ हजार ८८० जागा आहेत. त्या कला शाखेच्या १ हजार २८० जागा आहेत. विज्ञान शाखेच्या ४ हजार ३२० जागा, वाणिज्य शाखेच्या २८० जागा आहेत.
 

Web Title: 24 thousand 840 seats in Dhule district for 11th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.