पांझरा चौपाटीच्या कुंपणासाठी 25 लाखांची तरतुद!

By admin | Published: June 30, 2017 03:06 PM2017-06-30T15:06:43+5:302017-06-30T15:06:43+5:30

धुळे महापालिकेच्या महासभेने अर्थसंकल्पात सुचविली सुमारे 25 कोटींची वाढ

25 lakh provision for fencing of Panjhra Chowpatty! | पांझरा चौपाटीच्या कुंपणासाठी 25 लाखांची तरतुद!

पांझरा चौपाटीच्या कुंपणासाठी 25 लाखांची तरतुद!

Next

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.30- शहरातील पांझरा चौपाटीची जागा उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेकडे हस्तांतरीत झाली आहे. या जागेच्या संरक्षणासाठी व जागेला कुंपण करण्यासाठी अर्थसंकल्पात 25 लाख रूपयांची तरतुद करण्यात येत असल्याचे महापौर कल्पना महाले यांनी महासभेत स्पष्ट केल़े त्याचबरोबर सुमारे 25 कोटींची वाढ सुचविल्याचेही स्पष्ट केल़े
पांझरा चौपाटीचे अतिक्रमण काढून  नुकतीच मनपाकडे वर्ग झाली आह़े मात्र चौपाटीवरील साहित्याची नासधूस झाल्याचे प्रकार समोर आल्याने अर्थसंकल्पात 25 लाख रूपयांची तरतुद करण्यात आली़ यंदा प्रशासकीय अंदाजपत्रक 241 कोटी 87 लाख 49 हजार 907 रूपयांचे होत़े तर स्थायीने सुचविलेल्या वाढीनंतर ते 268 कोटी 37 लाख 69 हजार 904 रूपयांचे झाले आह़े 
अर्थसंकल्पात महासभेने सुमारे 25 कोटी रूपयांच्या तरतुदी सुचविल्या़ त्यात प्रामुख्याने नगरसेवक निधीसाठी प्रत्येकी 20 लाख (पहिल्या टप्प्यात 10 लाख व सुधारीत अंदाजपत्रकात 10 लाख), मनपा दवाखान्यात प्रसूती होणा:या महिलांना साडी चोळी व नवजात शिशूंना झबले, टोपी़ महिला सक्षमीकरणासाठी अंदाजपत्रकाच्या 5 टक्के तरतूद, मागासवर्गीय दुर्बल घटकांसाठी अंदाजपत्रकाच्या 5 टक्के निधी, अंध व अपंग नागरिकांसाठी अंदाजपत्रकाच्या 5 टक्के निधी, मागील नगरसेवक निधी व कार्यादेश दिलेल्या कामांसाठी 10 कोटींची तरतूद, नगरसेवक निधीसाठी स्वतंत्र खाते व त्यात दैनंदिन भरण्यातून रक्कम वर्ग करणे, नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 5 कोटींची तरतूद, विद्याथ्र्याच्या अभ्यासिका, वृक्षलागवड व संवर्धन, महापौर केसरी कुस्ती स्पर्धा व महिला कुस्ती स्पर्धेसाठी तरतुद, सांस्कृतिक उपक्रम आणि चौक सुशोभिकरणासाठी तरतूद, अमृत योजना व जिल्हा आणि राज्य नगरोत्थान योजनतील हिस्सा व शासन योजनांमधील हिस्सा भरण्यासाठी, शहरातील संवेदनशिल ठिकाणी सीसीटिव्ही बसविणे, नवीन पुतळे उभारण्यासाठी 1 कोटींची वाढीव तरतूद महासभेत करण्यात आली़

Web Title: 25 lakh provision for fencing of Panjhra Chowpatty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.