जिल्ह्यातील अडीच लाख रेशनकार्ड आधार लिंक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:51 AM2019-04-21T11:51:22+5:302019-04-21T11:51:52+5:30

९६ टक्के  उद्दिष्ट पूर्ण । आदिवासी तालुक्यात ‘बायोमेट्रीक’ची अडचण

2.5 million ration card support link in the district | जिल्ह्यातील अडीच लाख रेशनकार्ड आधार लिंक 

dhule

Next
ठळक मुद्देdhule

धुळे : सरकारी स्वस्त धान्य विक्रीत पारदर्शकता तसेच विक्रीतील काळा बाजार थांबविण्यासाठी रेशन दुकानदारांना पॉस मशिनव्दारे धान्य विक्रीची सक्ती केली  आहे़ त्यानुसार सध्या जिल्ह्यातील अडीच लाख लाभार्थीना बायोमेट्रिक पध्दतीव्दारे धान्य देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली़ 
धान्य वितरणात पारदर्शकता येणाºयासाठी रेशनकार्डला आधार लिंक करण्याचा निर्णय दोन वर्षापुर्वी राज्यशासनाकडून घेण्यात आला होता़ त्यासाठी चारही तालुक्यातील लाभार्थ्याची माहिती खाजगी कंपणीमार्फत घेतली जात आहे़ धुळे तालुक्यातील २५ हजार ९११ रेशनकार्ड धारकांपैर्की आतापर्यत २५ हजार २९४ लाभार्थ्यांचे कार्ड आधारला लिंक करण्यात आले आहे़ तर साक्रीत २२ हजार ९५३ कार्डधारकांपैकी २२ हजार ४५२ कार्ड आधार लिंक शिरपूर १४ हजार ७८ लाभार्थी १३ हजार ३१९ आधार लिंक तर शिंदखेडा तालुक्यातील १३ हजार ८७७ लाभार्थ्यापैकी १३ हजार ५०९ लाभार्थ्याचे आधार लिंक आहेत़ असे जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ५२४ रेशनकार्डधारकांपैकी २ लाख ८८ हजार १३६ लाभार्थ्यांचे आधारकार्ड लिंक करण्यात आले आहे़  
आदिवासी तालुक्यांना अडचण
साक्री व शिरपूर हे आदिवासीबहुल तालुके असून त्यांच्या लगत गुजरात मध्यप्रदेश हे राज्ये आहेत. दरवर्षी आदिवासी कुटुंबे उसतोडणीसाठी स्थलांतर करतात़ त्यामुळे आवश्यक कागदपत्र, पत्याचा पुरावा नसल्याने बायोमेट्रीक नोंदणी करता येत नाही़ त्यामुळे त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागते़  ऊसतोड व श्रमाचे काम करत असल्याने त्यांचे अंगठ्यांचे ठसे आधार नोंदणीसाठी जुळत नाही़ त्यामुळे त्यांची बायोमेट्रिक नोंदणी करतांना अडचणीला सामोरे जावे लागते़ 

Web Title: 2.5 million ration card support link in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे