महामार्गावरील 251 दारूची दुकाने हटणार
By admin | Published: February 14, 2017 12:31 AM2017-02-14T00:31:07+5:302017-02-14T00:31:07+5:30
जिल्ह्यातील स्थिती : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, एप्रिलपासून होणार अंमलबजावणी
‘धुळे : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या 500 मीटरच्या आत असलेली देशी व विदेशी दारूची दुकाने हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यात जिल्ह्यातील महामार्गावरील देशी- विदेशी मद्य विक्रीची 251 दुकाने हटवावी लागणार आहेत़ 1 एप्रिलपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याने परवाना नूतनीकरणाच्या फीमधून मिळणारा उत्पादन शुल्क विभागाचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडणार आह़े
सर्वोच्च न्यायालयाने 8 डिसेंबर 2016 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात महामार्गावरील मद्य विक्री दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश दिले आहेत़ राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून किमान 500 मीटर अंतरात मद्य विक्री दुकाने नसावीत, असे या आदेशात म्हटले आह़े महामार्गावरील वाढत्या अपघातांवर र्निबध घालण्यासाठी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत़
सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने सव्रेक्षण करून अहवाल मागविला होता़ त्यानुसार धुळे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने बांधकाम विभागाला पत्र देऊन कोणत्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावर किती दुकाने आहेत यांची माहिती मागविली होती़ ती उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाली आह़े त्यात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 135 व राज्य महामार्गावर 116 असे एकूण 251 दुकाने आढळली आहेत़
दुकानांना दिली माहिती
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर महामार्गावरील दारू दुकानांना आदेशाची माहिती देण्यात आली आह़े तसेच महामार्गावर मद्यांचे चिन्ह व मद्य उपलब्धतेबाबत जाहिराती लावू नये, असेही सूचित करण्यात आले आह़े, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली़
कोटय़वधीचा महसूल बुडणार
4जिल्ह्यात दारूची 321 दुकाने आहेत़ त्यात राष्ट्रीय महामार्गावर 135 तर राज्य महामार्गावर 116 अशी एकूण 251 दारूची दुकाने आहेत़ ही दुकाने बंद होणार असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोटय़वधीचा महसूल बुढणार आह़े
जिल्ह्यातील महामार्गावरील दारू दुकाने
परवाना राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग
परमिट रूम 88 56
बिअर शॉपी 25 32
देशी दारू विक्री 20 18
वाईन शॉप 02 10
एकूण 135 116