सरपंचपदाच्या ६ जागांसाठी २६ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:01 PM2019-02-15T22:01:34+5:302019-02-15T22:02:20+5:30

धुळे तालुका : ग्रा.प.साठी २४ रोजी मतदान

 26 candidates for 6 posts of Sarpanchpad | सरपंचपदाच्या ६ जागांसाठी २६ उमेदवार

dhule

Next

धुळे : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी वडणे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य बिनविरोध झाले. आता उर्वरित ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी २६ तर सदस्यपदासाठी १६४ उमेदवार रिंगणात आहे. यासाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
तालुक्यातील आर्वी, जुन्नेर, हेंद्रुण, काळखेडे, कुंडाणे (वरखेडी), गौताणे व वडणे या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. सरपंचपदासाठी ६८ व सदस्य पदासाठी २९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
१३ रोजी अर्ज माघारीचा अंतिम दिवस होता. यात सरपंचपदासाठी अर्ज दाखल केलेल्या ४१ जणांनी व सदस्यपदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या १२० जणांनी माघारी घेतली. यापैकी वडणे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड झाली. आता ग्रामपंचायतनिहाय सरपंच व कंसात सदस्यपदासाठी रिंगणात असले उमेदवार असे- आर्वी ३ (३२), जुन्नेर ३ (१८), हेंद्रुण ५ (३०), काळखेडे ९ (३५), कुंडाणे (वरखेडी) ३ (२७), गोताणे ३ (२२). ग्रामपंचायतींसाठी २४ रोजी मतदान होणार असून, २५ रोजी मतमोजणी होणार आहे.ग्रामीण भागात निवडणूक प्रचार जोरात सुरू झाला आहे.

Web Title:  26 candidates for 6 posts of Sarpanchpad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे