धुळे जिल्ह्यात 260 मद्यविक्रीची दुकाने बंद !

By admin | Published: April 1, 2017 06:20 PM2017-04-01T18:20:23+5:302017-04-01T18:20:23+5:30

शनिवारपासून जिल्ह्यातील महामार्गावरील देशी- विदेशी मद्यविक्रीची 260 दुकाने बंद करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आह़े

260 liquor shops in Dhule district closed! | धुळे जिल्ह्यात 260 मद्यविक्रीची दुकाने बंद !

धुळे जिल्ह्यात 260 मद्यविक्रीची दुकाने बंद !

Next

धुळे : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या 500 मीटरच्या  आत असलेले देशी व विदेशी दारूची दुकाने हटविण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार शनिवारपासून जिल्ह्यातील महामार्गावरील देशी- विदेशी मद्यविक्रीची 260 दुकाने बंद करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आह़े या दुकानांकडील स्टॉक दुकान मालकांच्याच गोदामामध्ये सील करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी दिली़
धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 141 व राज्य महामार्गावर 119 असे एकुण 260 दुकाने असल्याचे निष्पन्न झाल़े
 66 दुकाने सुरक्षित, परवान्यांचे नुतनीकरण होणार
जिल्ह्यात एकूण 326 दारूची दुकाने आहेत़ त्यात आता राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील 260 दारूची दुकाने बंद झाली आह़े तर 66 दुकाने सुरक्षित आहेत़ या दुकानांच्या परवान्यांचे नुतनीकरणही सुरू आह़े
स्टॉक, नोंदणी घेणार ताब्यात
महामार्गावरील बंद झालेल्या मद्यविक्रीच्या दुकानातील स्टॉक  नोंद वही ताब्यात घेण्यात येणार आह़े तसेच स्टॉक दुकान मालकांच्याच ताब्यात देवून त्यांच्या गोदामामध्ये सील करण्यात येणार आह़े  
 या दुकानांचे स्थलांतर करता येऊ शकत़े त्यासाठी दुकान मालकांना तसा प्रस्ताव दाखल करावा लागेल, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या सुत्रांनी दिली़

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावरील 260 दारू दुकाने बंद करण्याची कार्यवाही करण्यात येत आह़े त्यांचा स्टॉकही दुकान मालकांच्या ताब्यात देवून सील करण्यात येणार आह़े 

- मनोहर अंचुळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

 

Web Title: 260 liquor shops in Dhule district closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.