२७ पेयजल योजनांच्या कामांना दिली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:50 PM2019-06-17T22:50:35+5:302019-06-17T22:51:22+5:30

धुळे तालुका : कुणाल पाटील यांनी बोलविलेल्या आढावा बैठकीतील निर्णय

27 Speed works for drinking water schemes | २७ पेयजल योजनांच्या कामांना दिली गती

dhule

Next

धुळे : तालुक्यातील २७ गावात राष्टÑीय पेयजल योजनेअंतर्गत प्रस्तावित योजनांच्या कामांना गती देण्यासाठी ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाने स्वत: लक्ष देऊन तांत्रिक बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना आमदार कुणाल पाटील यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत आयोजित पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत दिला.
जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीस पाणीपुरवठा विभाग आणि ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पाच गावांच्या योजनेचा कार्यादेश निघाला
धुळे तालुक्यात २७ गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. त्यापैकी आंबोडे, नवे कोठरे, गरताड, निमडाळे, सावळी तांडा या पाच गावांच्या योजनेचा कार्यादेश निघाला आहे.
तर १९ गावांच्या योजनांचे अंदाजपत्रक तयार केले जात आहेत. तसेच नंदाळे खु. येथील पाणी पुरवठा योजनेला तत्वत: मान्यता मिळाली आहे. मात्र या योजना वेळेच्या आत पूर्ण करुन त्या - त्या गावातील पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून त्याचा पाठपुरवठा करण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. तालुक्यातील सौंदाणे गावासाठी डेडरगाव तलावावरुन पाण्याचा उद्भव असून ग्रामपंचायत सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष देऊन योजनेचे काम पूर्ण करण्याच्या सुचना बैठकीत आमदार कुणाल पाटील यांनी दिल्या.
तसेच योजनेतील काही गावांना नवीन विहीर, पाण्याचे स्त्रोत बदलण्याची गरज आहे. काही ठिकाणी नवीन पाईप लाईन पाणी टाकी अशी कामे करावयाची आहेत. अशा कामांचा त्वरित सर्व्हे करुन अंदाजपत्रक त्वरित सादर करावे. खेडे येथे नवीन पाण्याची टाकी आणि पाईप लाईन तर कुंडाणे येथे अंचाळे धरणातून पूरक योजना करण्याच्या सुचनाही आमदारांनी दिल्या.
बैठकीस जिल्हा परिषद सभापती मधुकर गर्दे, पंचायत समिती उपसभापती दिनेश भदाणे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग बी.एस.सेंगार, सहायक कार्यकारी अभियंता एस.बी.पडयार, उपअभियंता एस.बी.सोनवणे, एन.डी.पाटील, जयदिप पाटील, व्ही.ए.गावीत, कृउबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, प.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, डॉ.दरबारसिंग गिरासे, जि.प.सदस्य राजू मालचे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलाही मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.

Web Title: 27 Speed works for drinking water schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे