पश्चिम बंगालचे २७ मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:31 PM2020-05-18T21:31:45+5:302020-05-18T21:32:59+5:30

शिरपूर : प्रशासनाने केली चार खाजगी वाहनांची व्यवस्था

27 workers left for West Bengal | पश्चिम बंगालचे २७ मजूर रवाना

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद येथील २७ मजूर हे मार्बलचे काम करत होते. लॉकडाऊनमुळे काम नसल्याने घरी परतण्यासाठी त्यांची ओढ वाढली होती़ ४ खाजगी वाहनाने या २७ मजुरांची जाण्याची व्यवस्था करण्यात आली़
१७ रोजी रात्रीच्या सुमारास तहसिलदार आबा महाजन यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले़ यावेळी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, नगरपालिका सीओ अमोल बागुल, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, नगरसेवक इरर्फान मिर्झा, श्यामकांत ईशी, लब्बैक फाऊंडेशनचे अध्यक्ष मजहर पठाण, मुस्लिम सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आबीद मनसुरी उपस्थित होते़
पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद येथील हे कामगार शहरात मार्बलचे काम करीत होते़ लॉकडाऊनमुळे काम नसल्याने घरी परतण्यासाठी त्यांची ओढ वाढली होती़ अखेर प्रशासनाच्या परवानगीने ४ खाजगी वाहनाने या मजुरांची जाण्याची व्यवस्था करण्यात आली. लब्बैक फाउंडेशन व मुस्लिम सेवा संघाच्यावतीने या मजुरांचे मोफत आॅनलाइन इ पासचे फॉर्म भरण्यात आले होते़
लब्बैक फाउंडेशनचे अध्यक्ष मजहर पठाण, शाहिद काश्मिरी, जमिल पटवे, सलिम तेली यांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर आॅनलाईन फॉर्म भरण्यास मेहनत घेतली होती़ नगरसेवक इरर्फान मिर्झा यांनी इ-पास संदर्भात सतत जिल्हा व स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाची समस्या सोडवली. लब्बैक फाऊंडेशनचे अध्यक्ष मजहर पठाण, शाहिद काश्मिरी, जमिल पटवे, इब्राहिम शेख, मुस्लिम सेवा संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष परवेज मलिक, उपाध्यक्ष आबीद मनसुरी, तालुका अध्यक्ष डॉ.शकील खान, शहराध्यक्ष फारूक शेख, सैय्यद जाकीर ठेकेदार, मुश्ताक शेख यांनी या मजुरांच्या जाण्याची व्यवस्था केली़
या मजुरांच्या रवानगीसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन, नायब तहसिलदार गणेश आढारी, सीओ अमोल बागुल यांचे सहकार्य लाभले़

Web Title: 27 workers left for West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे