धुळे शहरात २७८ रुग्णांवर क्षयरोगाचे उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 09:35 PM2017-12-03T21:35:51+5:302017-12-03T21:36:37+5:30
मनपा : सोमवारपासून क्षयरुग्ण शोध मोहिम; संशयित रुग्णांना मोफत औषधोपचार
यांना मिळणार प्रोत्साहनपर भत्ता
या कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचा रुग्ण सापडून देणाºया मनपा कर्मचाºयाला ५०० रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. नागरिकांनी या मोहीमेंतर्गत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. फुफुसांचा क्षयरोग असणारे बरचसे क्षयरुग्ण त्यांना होणाºया त्रासाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
क्षयरोग शोध मोहीमेस सोमवारपासून सुरुवात होत आहे. शहरातील झोपडपट्टी व दाटवस्तीच्या भागात विशेषत: ही मोहीम राबविली जाईल.या मोहीमेंतर्गत क्षयरोग निदान चाचण्या या मोफत केल्या जाणार असून या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
- डॉ. बी. बी. माळी, शहर क्षयरोग अधिकारी, मनपा