धुळे जिल्ह्यातील २९५ बस फेºया रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:23 PM2018-06-08T12:23:50+5:302018-06-08T12:23:50+5:30
लाखोंचे नुकसान : प्रवाशांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पगारवाढ व इतर मागण्यांसाठी एस.टी.कर्मचाºयांनी मध्यरात्रीपासून संप पुकारलेला आहे. त्याचा धुळे जिल्ह्यातील बससेवेवर परिणाम झालेला आहे. तुरळक बसफेºया सुरू आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच आगारातून ३९१ पैकी २९५ बसफेºया रद्द करण्यात आल्याचे धुळे विभाग नियंत्रक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
े जिल्ह्यात एस.टी. महामंडळाचे धुळ्यासह साक्री, शिंदखेडा, शिरपूर व दोंडाईचा येथे आगार आहेत. या आगारातून लांब पल्यासह ग्रामीण भागात बसेस सुटत असतात. मात्र एस.टी.कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने, त्याचा परिणाम सेवेवर झालेला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच आगाराच्या एकूण २९५ बस फेºया रद्द करण्यात आलेल्या आहेत. यात धुळे आगाराच्या ३९, साक्री ५९, दोंडाईचा आगाराच्या ३८ बस फेºयांचा समावेश आहे. तर या पाचही आगारातून ९६ बसफेºया सुटलेल्या आहेत. त्यात धुळे ८६, साक्री २, व दोडाईचा आगारातून ८ बसफेºया सोडण्यात आल्या.
शिरपूर, शिंदखेड्यात कडकडीत संप
शिरपूर आगारातून ११२ व शिंदखेडा आगारातून ४७ बस सुटत असतात. मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत या दोन्ही आगारातून एकही बस सुटलेली नाही.
प्रवाशांचे हाल
कर्मचाºयांनी संप पुकारल्याची माहिती अनेक प्रवाशांना नव्हती. मात्र सकाळी बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना संपाची माहिती मिळाली. त्यामुळे अनेकांना खाजगी वाहनांनीच प्रवास करावा लागला.
खाजगी प्रवाशी वाहतूक जोरात
एस.टी.कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाचा फायदा खाजगी प्रवाशी वाहतुकीला होत आहे. जिल्ह्यातील सर्वच मार्गावर खाजगी प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यात प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारण्यात येत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली.