5 पैकी 3 वैद्यकीय अधिका:यांचे अर्ज अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:14 PM2017-08-30T13:14:48+5:302017-08-30T13:15:10+5:30

मनपा प्रशासनातर्फे कंत्राटी पद्धतीने भरती : विविध पदासांठी 103 उमेदवारांचे अर्ज

3 of 5 Medical Officers: Their application is ineligible | 5 पैकी 3 वैद्यकीय अधिका:यांचे अर्ज अपात्र

5 पैकी 3 वैद्यकीय अधिका:यांचे अर्ज अपात्र

Next
ठळक मुद्देउमेदवारांची गर्दी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी सर्वाधिक अर्ज 

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 30 -  मनपातर्फे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) वैद्यकीय अधिकारी व इतर पदांसाठी मंगळवारी भरती प्रक्रिया घेण्यात आली. त्यात वैद्यकीय अधिकारी पदाच्या 3 जागांसाठी 5 उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु, या पदासाठी  एम.बी.बी.एस. व मेडिकल कौन्सीलकडून नोंदणी ही पात्रता असल्यामुळे तीन उमेदवारांचे अर्ज  अपात्र ठरविण्यात आले. 
मनपातर्फे स्टाफ नर्स, एएनएम. डाटा एन्टी ऑपरेटर कम अकौउन्टंट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अटेडन्ट आदी रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनातर्फे पात्र उमेदवारांसाठी असलेली शैक्षणिक अर्हता यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 103 उमेदवारांनी विविध पदांसाठी अर्ज दिला होता. अर्ज सादर करणा:या सर्व उमेदवारांच्या मुलाखती मनपा सभागृहात उपायुक्त रवींद्र जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक संजय शिंदे यांनी घेतल्या. तर डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकौउन्टंट या पदासाठीच्या मुलाखती मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्वतंत्रपणे त्यांच्या दालनात घेतल्या. 
डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकौउंटन्ट पदाच्या दोन जागांसाठी 31 अर्ज आले होते. परंतु, प्राप्त अर्जापैकी केवळ 10 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले. स्टाफ नर्स पदाच्या 2 जागांसाठी 10 अर्ज आले होते. पैकी 7 अर्ज पात्र ठरविण्यात आले असून एएनएम पदाच्या 1 जागेसाठी प्राप्त 28 उमेदवारांनी केलेल्या अर्जापैकी 5 उमेदवार,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदाच्या 2 जागांसाठी 8 अर्ज आले होते; पैकी 7 उमेदवार तर अटेडन्टच्या 1 पदासाठी प्राप्त 21 अर्जापैकी 5 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर त्यांना पात्र ठरविण्यात आले आहे. 
आज प्रसिद्ध होणार यादी 
दरम्यान, मुलाखीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी बुधवारी सकाळी मनपात प्रसिद्ध केली जाणार असून मुलाखीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मंगळवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली होती. 
मनपाच्या विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून मनपाच्या प्रांगणात झाली होती. परंतु, मुलाखती उशिरा सुरू झाल्यामुळे उमेदवारांना ताटकळत थांबून रहावे लागले. परिणामी, अनेकांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून ही पदे रिक्त होती. ही पदे भरल्यानंतर प्रशासकीय कामांना गती मिळणार आहे.  

Web Title: 3 of 5 Medical Officers: Their application is ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.