भीतीने ३८० कोंबड्यांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:29 AM2019-08-27T11:29:41+5:302019-08-27T11:30:16+5:30

मध्यरात्रीपर्यंत बिबट्याचा धुमाकूळ : चिकसे येथील गांगेश्वर शिवारातील घटना 

3 chickens killed in fear | भीतीने ३८० कोंबड्यांचा मृत्यू 

भीतीने ३८० कोंबड्यांचा मृत्यू 

Next

पिंपळनेर : संध्याकाळी पोल्ट्री फॉर्मवर येऊन धुमाकूळ घालणाºया बिबट्याच्या भीतीने तेथील ३८० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून हजारोंचे नुकसान झाले आहे. साक्री तालुक्यातील चिकसे येथे रविवारी ही घटना घडली असून तेथील सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. 
चिकसे येथील गांगेश्वर शिवारात अविनाश अंबादास पाटील यांचे मातोश्री पोल्ट्री फॉर्म असून तेथे सुमारे ४ हजारापेक्षा जास्त कोंबड्या आहेत. रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक फॉर्मवर येऊन जाळीवर धडका देत डरकाळी फोडल्याने भीतीनेच फॉर्ममधील सुमारे ३८० कोंबड्यांनी जीव सोडला. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली असून मध्यरात्री एक वाजेपर्यंत बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. 
बिबट्या धुमाकूळ घालत असल्याचे कळताच त्याला पळविण्यासाठी फटाके फोडण्यात आले. तसेच मिरचीचा धुराळा केला व लाकडे पेटवून मोठी शेकोटीही करण्यात आली. त्यानंतर बिबट्याने काढता पाय घेतला. 
३८० कोंबड्या मृत 
सकाळी पोल्ट्री फॉर्मवर जाऊन पाहणी केली असता सुमारे ३८० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची सूचना वनविभागाच्या येथील कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला. 
बिबट्याचा उच्छाद सुरूच
वनविभाग मात्र सुस्त  
शेतकरी पाटील यांनी सांगितले की, गांगेश्वर शिवारात बिबट्याचा उच्छाद कायम आहे. कारण यापूर्वीही २० ते २५ गायी, शेळ्या व म्हशी या बिबट्याने फस्त केल्या आहेत. मात्र वनविभागाकडून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व संतापही व्यक्त होत आहे. गुरांवरच नव्हे तर बिबट्याने ग्रामस्थांवरही हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. बिबट्याच्या शोधासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यासाठी वनविभागाकडे पैसे नाहीत. पिंजराही लावला जात नसल्याने बिबट्या मोकाट असून पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थांना भयभीत करत आहे. शेतकºयांना तर जास्त हाल सहन करावे लागत आहेत. वनविभाग एखाद्या शेतकºयाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का, असा प्रश्न शेतकरी पाटील यांनी उपस्थित केला. 
वनविभागाने त्वरित पिंजरा बसवून संपूर्ण परिसर पिंजून काढत बिबट्याचा शोध घ्यावा. त्यास पिंजºयात कैद केल्याशिवाय स्वस्थ बसू नये. अन्यथा चिकसे, गांगेश्वर-सामोडे परिसरातील सर्व शेतकरी वनविभागाविरोधात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा वनविभागाला देण्यात आला आहे. 

Web Title: 3 chickens killed in fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे