कळमसरे फाट्याजवळ अॅपेरिक्षा-कंटनेर अपघातात ३ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 06:02 PM2019-06-18T18:02:45+5:302019-06-18T18:03:04+5:30
शिरपूर : सूतगिरणीतील मजूरांना घेवून जात असतांना घडली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : मुंबई आग्रा महामार्गावरील कळमसरे फाट्यासमोर सूतगिरणीतील मजूरांना घेवून जाणारा अॅपेरिक्षा चालक विरूध्द दिशेने रस्ता ओलांडत असतांना इंदूरकडून येणाºया एका कंटनेरने धडक दिल्यामुळे अॅपेरिक्षातील १ महिला मजूर जागीच ठार झाली तर चालकासह अन्य ७ मजूर गंभीररित्या जखमी झालेत़ दरम्यान, धुळे येथे उपचार घेत असतांना २ जणांचा मृत्यु झाला़ एकूण या अपघातात ३ जणांचा मृत्यु झाला़
१८ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कळमसरे फाट्यासमोरील गोल्ड फॅक्टरीसमोर हा अपघात झाला़ शहरातील काही मजूर सूतगिरणीला कामाला आहेत, त्याची ड्युटीवरील बस सुटल्यामुळे ते खाजगी अॅपेरिक्षा क्रमांक एम़एच़१८-डब्ल्यु-५७०८ ने ७ मजूर सूतगिरणीकडे जायला निघालेत़ अॅपेरिक्षा चालक उड्डान पूलाचा रस्ता ओलांडून विरूध्द दिशेकडे जाण्यासाठी महामार्ग रस्ता ओलांडत असतांना इंदूरकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनर क्रमांक एम़एच़४६-एफ-७२२८ ने धडक दिल्यामुळे अॅपेरिक्षाने २-३ पलटी खाल्ली़ त्यात कल्पनाबाई दगा कोळी (वय ४१, रा.भरतसिंग नगर, शिरपूर) ही महिला जागीच ठार झाली तर लक्ष्मीबाई रमेश मराठे (३५), प्रमिलाबाई तुकाराम मराठे (६०), ज्योती दगा कोळी (२०), नरेंद्र दगा मराठे (२५), कविता दगडू अहिरे (३०), सुदामसिंग पदमसिंग राजपूत (६०) सर्व रा.शिरपूर, सुभाष शिलदार पावरा (३६) रा.नेवाली हे जखमी झालेत. अपघाताने झालेल्या आवाजामुळे परिसरातील लोक धावून गेलेत़ त्यांनीच जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढल्यानंतर महामार्ग रूग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले़ डॉ.कल्पेश वाघ, विनोद निकम, भगवान बोरसे आदींनी जखमींवर उपचार केलेत. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले़
दरम्यान, धुळे येथे नेत असतांना रस्त्यावरच लक्ष्मीबाई रमेश मराठे (३५) व प्रमिलाबाई तुकाराम मराठे (६०) दोन्ही राहणार भरतसिंग नगर शिरपूर या दोघे महिलांचा मृत्यु झाला़
अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत हे पोलिस कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झालेत. अपघातानंतर कंटेनर चालक स्वत:हून पोलिसात हजर झाला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
आईचा मृत्यु़़़ मुलगी गंभीर
या अपघातात कल्पनाबाई दगा कोळी या विधवा महिलेचा मृत्यु झाला असून तिच्या सोबत मुलगी ज्योती दगा कोळी ही देखील सोबत कामाला जात होती़ ती देखील या अपघातात गंभीर दुखापती झाली आहे़ कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे ते सूतगिरणीत कामाला जात होते़ मयताला एक लहान मुलगा आहे़
अखेर गतीरोधक काढले़़़
सावळदे ते पळासनेर गावादरम्यान अनेक ठिकाणी यापूर्वी महामार्गावर अपघात होवू नये म्हणून गतीरोधक टाकण्यात आले होते़ त्यामुळे या मार्गावर मोठ्या संख्येने गतीरोधकांची संख्या वाढली होती़ मात्र गत महिन्यात या महामार्गावरील सारेच गतीरोधक काढून टाकल्यामुळे तेव्हापासून अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसते़