कपाशी विक्रीतून मिळालेल्या पावणे तीन लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 10:39 PM2020-01-11T22:39:02+5:302020-01-11T22:39:22+5:30

शेतकऱ्याची फिर्याद : निमडाळ्याच्या दोघांविरुध्द गुन्हा

3 lakh fraudulently obtained from cotton sale | कपाशी विक्रीतून मिळालेल्या पावणे तीन लाखांची फसवणूक

कपाशी विक्रीतून मिळालेल्या पावणे तीन लाखांची फसवणूक

Next

धुळे : ४२ क्विंटल कपाशी खरेदी करुन तिची विक्री करुन आलेल्या पैशांची वर्षभरातही परतफेड केली नाही़ म्हणून पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी धुळे तालुक्यातील निमडाळे येथील दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला़
धुळे तालुक्यातील भोकर येथील ईश्वर परशुराम पाटील (५४) या शेतकºयाने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, धुळे तालुक्यातील निमडाळे येथील योगेश वाल्मिक पाटील आणि वाल्मिक गोरख गोरख पाटील यांनी १६ एप्रिल २०१९ रोजी धुळे तालुक्यातील निमडाळे गावात ६ हजार ५०० रुपये क्विंटल दराने ४२ क्विंटल कपाशी खरेदी केली़ ती कपाशी जिनींगमध्ये विकली़ तरीही पैसे दिले नाही़ त्यामुळे ईश्वर पाटील आणि इतर शेतकऱ्यांची सुमारे २ लाख ७३ हजार रुपयाची फसवणूक झाली आहे़
याप्रकरणी संशयित योगेश वाल्मिक पाटील आणि वाल्मिक गोरख गोरख पाटील (दोन्ही रा़ निमडाळे, ता़ धुळे) यांच्या विरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस करीत आहेत़

Web Title: 3 lakh fraudulently obtained from cotton sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे