१२३ कैद्यांचा कारागृहात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:16 PM2019-10-02T22:16:30+5:302019-10-02T22:16:52+5:30
जिल्हा कारागृह : महात्मा गांधी विचार परीक्षेत यश
धुळे : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा कारागृहात कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी म़ गांधी यांच्या जीवणावर आधारीत घेण्यात आलेल्या परीक्षेतील उत्तीर्ण १२३ कैद्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़
या प्रसंगी विनोबा विभागात, कुलगुरु माहुलीकर व कारगृह अधीक्षक दिपा आगे यांचे हस्ते फलक अनावरण करण्यात आले. त्यानंतर मा.गांधी व लालबहादुर शास्त्री यांचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रसताविक प्रा.विलास चव्हाण, हेमंत पोतदार यांनी केले. डॉ. विश्वास पाटील, दिलीप सपकाळ, माहलीकर यांनी मार्गदर्शन केले़ गांधी विचार परिक्षेतील पुरुष बंदी, महिला बंदी तसेच कर्मचारी अशा १२३ कैद्यांनी परीक्षा दिली होती. पहिल्या तीन आलेल्या विजेत्यांना माहुलीकर, दिपा आगे, जे.ए.शेख, बनसोडे यांचे हस्ते बक्षिस देण्यात आले़
जिल्हा कारागृहातील चांगले वर्तन तसेच प्रामाणिक कामगिरीबद्दल कल्याण दिनानिमित्त अधीक्षक दिपा आगे यांनी राहुल मुजाळदे, सुनिल वाघ, गोकुळ लाहुळकर यांनी कारागृहाची १५ दिवस शिक्षा माफ केली़