१७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 09:48 PM2019-08-28T21:48:59+5:302019-08-28T21:49:20+5:30
माळी समाज : मान्यवरांनी केले मार्गदर्शन
सोनगीर : अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने धुळे शहरातील सैनिक भवन येथे जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १७५ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. माळी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विलासराव पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते़
गुणगौरव सोहळ्यामध्ये धुळे शहर व ग्रामीण, शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यातील समस्त माळी समाजाच्या सुमारे १७५ गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या तसेच स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण यशवंतांचा ही शाल श्रीफळ व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला़
यावेळी पेसा अंतर्गत विकास कामे पूर्ण करून राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामसेवक म्हणून पुरस्कार प्राप्त पंकज पगारे व पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या दोन तरूणांचा विशेष सत्कार करण्यात आला़
या वेळी विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे, जिल्हाध्यक्ष आर के.माळी, भिला पाटील, डॉ. चौधरी, राजेन्द्र माळी, नाशिक विभागीय प्रसिद्धी प्रमुख राजेन्द्र गवळी, गुलाब माळी, सुनील माळी, सदाशिव माळी, भगवान जगदाळे , गणेश खलाणे, राजकिशोर माळी, भिका माळी, डॉ. बोढरे, प्रा. नामदेव माळी,उन्नती माळी, हिरामण माळी, गोपाळ देवरे, भगवान जगदाळे ,हरिचंद्र रेंडे, शैलेश माळी, हिंमत माळी, तारका विवरेकर, किशोर तायडे, डॉ. दिनेश माळी, राम माळी, उत्तम माळी, अविनाश माळी, बापू खलाणे, भटू माळी, नितीन निझर, कंचन माळी, लताबाई माळी, डॉ. स्वप्निल देवरे, साहेबराव महाजन, सुदाम माळी, पराग गवळे, प्रकाश माळी, मनोज सोनवणे, रमेश माळी, विलास घरटे, दिलीप घरटे, संतोष माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक महासंघाचे जिल्हाध्यक्ष आर.के.माळी यांनी केले.
सूत्रसंचालन हेमंतराव माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे यांनी मानले. कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.