धुळे जिल्ह्यात अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी 30 लाखांचा निधी

By Admin | Published: April 6, 2017 03:35 PM2017-04-06T15:35:47+5:302017-04-06T15:35:47+5:30

धुळे लोकसभा मतदारसंघातील चिंचवार व लामकानी येथे अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी एकूण 30 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

30 lakhs funds for minority population development in Dhule district | धुळे जिल्ह्यात अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी 30 लाखांचा निधी

धुळे जिल्ह्यात अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी 30 लाखांचा निधी

googlenewsNext

 धुळे, दि.6- धुळे लोकसभा मतदारसंघातील चिंचवार व लामकानी येथे अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी एकूण 30 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. चिंचवार येथे अल्पसंख्याक वस्तीमध्ये रस्ता कॉँक्रीटीकरण, शादीखाना बांधकाम व लामकानी येथेही रस्ता कॉँक्रीटीकरण या कामासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रय}ांमुळे हा निधी प्राप्त होणार आहे. 

तालुक्यातील या दोन्ही गावांना गेल्या अनेक वर्षापासून अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये विकास कामे होणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने या गावातील ग्रामस्थांनी निवेदन डॉ.भामरे यांच्याकडे नुकतेच सादर केले होते. त्याची तत्काळ घेत डॉ.भामरे यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा करून राज्य सरकारच्या ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम 2016-17 अंतर्गत तालुक्यातील चिंचवार गावासाठी 20 लाख व लामकानीसाठी 10 लाख असा एकूण 30 लाखांचा निधी मिळविण्यात यश मिळविले. त्यामुळे या दोन्ही गावातील अल्पसंख्याक समाजाच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

Web Title: 30 lakhs funds for minority population development in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.