प्रयोग शाळेत ३०० नमुने तपासले जातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 12:30 PM2020-04-30T12:30:48+5:302020-04-30T12:31:35+5:30
मृृदुला द्रविड : १०० नमुण्याची क्षमता
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बाधितांची तपासणी स्थानिक जिल्हात होण्यासाठी शासनाने यंदा राज्यात पहिली लॅब भाऊसाहेब हिरे रूग्णालयात उपलब्ध करून दिली आहे़ या प्रयोगशाळेत दररोज ३०० नमुन्यांची तपासणी केली जाते़ तर यापूर्वी ९० ते १०० नमुने तपासले जात होते़ अशी माहिती हिरे वैद्यकीय प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ.मृदुला द्रविड यांनी लोकमतशी बोलतांना दिली़
प्रश्न - हिरे वैद्यकीय प्रयोगशाळेत किती कर्मचारी कार्यरत
उत्तर : प्रयोगशाळेत १५ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच सुक्ष्मजीवशास्र व एचआयव्ही विभागातील तंत्रज्ञांची देखील मदत होत असते. निजंर्तुक वातावरणात स्वॅब तपासावे लागतात. स्वॅब तपासतांना विषाणू मधून आरएनए वेगळा काढला जातो नंतर त्याच्या वेग वेगवेगळ्या कॉपीज तयार करण्यात येतात. या प्रक्रियेत तंत्रज्ञ व कर्मचारी महत्त्वाची भूमिका निभावतात.
प्रश्न - किती नमुने तपासण्याची प्रयोगशाळेची क्षमता आहे ?
उत्तर : आधी एका दिवसात १०० नमुन्यांची तपासणी केली जात होती. मात्र आता मनुष्यबळ वाढविले आहे तसेच तपासणीच्या तुकड्यांमध्ये वाढ केली आहे. यामुळे सध्या एका दिवसांत ३०० नमुन्यांची तपासणी केली जात आहे.
प्रश्न - रिपोर्ट प्राप्त होण्यासाठी किती कालावाधी लागतो?
उत्तर : एका तुकडीत ४५ नमुने तपासण्यात येतात. दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. कोरोनाची शक्यता असणारे नमुने वेगळे काढले जातात. रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर आठ तासांत समजते. रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असेल तर त्याची पुन्हा तपासणी करून पुष्ठी करण्यात येते. यात दोन तास अधिक वेळ लागतो.
प्रश्न- इतर जिल्ह्यातील तपासण्यासाठी येणाऱ्या नमुयांचे कसे नियोजन असते?
उत्तर : जे नमुने आधी येतात त्यांची तपासणी लगतच्या तुकडीत केली जाते. तसेच अत्यवस्थ व मृत्यू झालेल्या रूग्णांना प्राधान्य दिले जाते.तपासणीसाठी जाणाºया स्वॅबच्या प्रत्येक तुकडीत अशा रूग्णांसाठी तीन किंवा चार जागा राखीव ठेवलेल्या असतात.
प्रश्न - नमुने तपासतांना वैद्यकीय कर्मचारी कशी दक्षता घेतात ?
उत्तर : नमुने तपासतांना सुरक्षेची पुर्ण खबरदारी घेतली जाते. कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट परिधान केलेले आसतात. त्यामुळे नाक, कान, डोळे पुर्णपणे झाकले जातात.
असा असतो प्रयोगशाळेतील दिनक्रम
सकाळी ९ वाजता प्रयोगशाळेत पोहचते. तोपर्यंत रात्री दाखल झालेल्या रूग्णांचे स्वॅब घेण्यात येतात. दिवसभरात विविध तुकड्यांमध्ये नमुने तपासले जातात. कामात व्यस्त असल्यामुळे दिवस कसा जातो तेदेखील कळत नाही. रात्री ११ वाजेपर्यंत नमुन्यांची तपासणी सुरू असते. नमुने जास्त असले तर आणखी उशीर होतो.
स्वॅब घेण्याची प्रक्रिया कशी असते?
कोणाचे स्वॅब घ्यायला पाहिजे यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. परदेश प्रवास झाला असेल किंवा पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेला असल्यास त्या व्यक्तीचे स्वॅब घेतले जावे असे निकष आहेत. प्रवासाचा इतिहास असलेल्या वा पॉझिट्व्हि रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे स्वॅब घेण्यात येतात. तसेच कोरोनाचे लक्षणे असणाºया रूग्णांचे स्वॅब घेतले जातात. हिरे रूग्णालयात सकाळी ७ ते ९ या वेळे दरम्यान स्वॅब घेण्यात येतात. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येते. तसेच जळगाव , नाशिक , मालेगाव, नंदुरबार जिल्ह्यातील तपासणीला येतात.