धुळे जिल्हा कार्यक्षेत्रातून अखेर ३२ जणं हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 06:45 PM2018-11-15T18:45:02+5:302018-11-15T18:48:04+5:30
मनपा निवडणूक : पोलीस अधीक्षकांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी ३२ गुंडांना दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे़ गुरुवारी सायंकाळी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला़
दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्यामध्ये किरण दादाभाऊ ढिवरे, आकाश प्रकाश येवलेकर, अनिल भाईदास पाटील, रोहित प्रभाकर सोनवणे, सचिन रमेश लोंढे, गौरव संजय इंगळे (सर्व रा़ मोगलाई, भीमनगर, साक्री रोड धुळे), संभा उर्फ समाधान देविदास निकम, रियाज रज्जाक शेख, भटू राजेश माळी, पवन रमेश माळी, कपील सुभाष शिंदे, ललीत ज्ञानेश्वर मराठे, विनोद छगन बेलदार, राकेश सुरेश पिंपळे (सर्व रा़ स्टेशन रोड, धुळे), विक्की उर्फ विक्रम महादेव परदेशी, स्वप्निल उर्फ नंदू महादेव परदेशी, महादेव उर्फ महादू चैत्राम परदेशी, संतोष रविंद्र परदेशी, करण रविंद्र परदेशी, धिरज रामेश्वर परदेशी, योगेश सुभाष अजबे, प्रशांत बाबुराव माने (सर्व रा़ कुंभारखुंट, गल्ली नंबर ५-६ची बोळ, चैनी रोड, धुळे), मंगल गिरधर गुजर, अमोल मधुकर जाधव, सुनील बंडू गवळी, पंकज उर्फ शेरा गणेश सुर्यवंशी (चौधरी), धर्मराज गिरधर गुजर, कार्तिक दिलीप अग्रवाल, आकाश विनोद गुजर, रोशन भटू पारखे, मुकेश मोहन बारी, मोहन चंद्रकांत टकले (सर्व रा़ गल्ली नंबर ५, घड्याळवाली मशिदजवळ, धुळे) यांचा समावेश आहे़
मुंबई पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये दोन वर्षांसाठी या ३२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे असा प्रस्ताव धुळे शहर आणि आझादनगर पोलीस निरीक्षक यांच्याकडून पाठविण्यात आला होता़ आलेल्या प्रस्तावांची चौकशी करण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती़ चौकशी अहवाल हिरे यांच्याकडून पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याकडे पाठविण्यात आला होता़ चौकशी अहवाल आणि प्रस्तावावर अंतिम कामकाज होऊन पोलीस अधीक्षकांनी गुरुवारी सायंकाळी हद्दपारीचा निर्णय घेतला़