वृक्षरोपणासाठी बोरविहीरच्या रोपवाटीकेतील ३४ हजार वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 10:05 PM2019-07-07T22:05:54+5:302019-07-07T22:06:33+5:30
महापालिका : प्रभागातील नागरिकांना रोपांचे वाटप
dधुळे : जिल्ह्यासाठी ६५.७६ लाख तर मनपाला १ लाख २५ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ त्यासाठी बोरविहीर येथील रोपवाटीकेतुन ३४ हजार रोपे आणण्यात आली आहे. त्यांचे वाटप प्रत्येक प्रभागातील नागरिकांना केले जात आहे.
वृक्षलागवडीचे उदिष्ठे पुर्ण करण्यासाठी मनपाकडून बोरविहीर येथे रोपवाटीका तयार करण्यात आली आहे़ त्यात लिंब,चिंच, शिवण, शिसम, प्लेटों फॉर्म अशा विविध जातीचे आतापर्यंत ३४०० हजार रोपांची वाहतुक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली़
शासनाकडून वृक्षलागवडीसाठी शाळा, महाविद्यालय विविध सरकारी कार्यालयांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात महापालिका क्षेत्रातील अवधान, वरखेडी, चितोड, नकाणे, बाळापुर, प्रिंपी, मंहिदळे गावांसह शहरातील टॉवर बगिचा, पांझरा वॉटर सप्लाय केंद्र परिसर शहरातील २४९ सार्वजनिक जागा, आरोग्य केंद्र, महापालिकेच्या १९ प्रभागातील शाळा, महाविद्यालय, अमरधाम अशा विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येत आहे़
प्रत्येक प्रभागाला ‘टार्गेट’
वृक्षलागवडीसाठी शहरातील प्रत्येक प्रभागाला उद्दिष्ट दिले जाणार असून रोपे देखील पुरविली जाणार आहेत़ शिवाय लागवड झालेल्या वृक्षांचे ‘जिओ टॅग’ फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहेत़ प्रत्येक प्रभागाला जागेच्या उपलब्धतेनुसार वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यानुसारच रोपांचे वितरण होणार असल्याचे सुत्रांची सांगितले़
रोपांची मागणी नोंदविली
वृक्षलागवडीची मोहिम केवळ शहरातच नव्हे तर जिल्हाभरात राबविली येत आहे़ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनासह विविध विभागाच्या अधिकाºयांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे़