खरीपसाठी आतापर्यंत ३६ टक्के कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:17 PM2020-05-11T21:17:38+5:302020-05-11T21:18:01+5:30

धुळे : धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची माहिती

36% loan disbursement for kharif so far | खरीपसाठी आतापर्यंत ३६ टक्के कर्ज वाटप

खरीपसाठी आतापर्यंत ३६ टक्के कर्ज वाटप

Next

धुळे :खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप सुरू झालेले असून, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतर्फे आतापर्यंत ४९३३.२९ लाख कर्जाचे वाटप झाले असून, त्याची टक्केवारी ३६ टक्के असल्याची माहिती सहायक निबंधक मनोज चौधरी यांनी दिली.
२०२०-२१ या वर्षांसाठी पीक कर्ज वाटपास एक एप्रिलपासून सुरूवात झालेली आहे. खरीप हंगामासाठी १३ हजार ७४९ लाख पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. ८ मे पर्यंत ४ हजार ९३३.२९लाख कर्जाचे ७ हजार २५१ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेले आहे. त्याची टक्केवारी ३६ टक्के आहे.
बियाण्यांची मुबलकता
जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी ४० हजार ७९५ क्विंटल विविध बियाणे उपलब्ध होणार आहे. यात महाबिजकडून २२९६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार आहे.
तर खरीप हंगामासाठी १ लाख २ हजार ७२० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. लवकर खते उपलब्ध होतील अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आली आहे.

Web Title: 36% loan disbursement for kharif so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे