मतदान अधिकारासाठी मोजावे लागताय ४ रुपये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:07 PM2018-10-29T23:07:12+5:302018-10-29T23:10:48+5:30

नोंदणीसाठी उरले अवघे दोन दिव

4 rupees have to be paid for voting rights | मतदान अधिकारासाठी मोजावे लागताय ४ रुपये 

मतदान अधिकारासाठी मोजावे लागताय ४ रुपये 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन एकीकडे मतदार नोंदणीचे आवाहन करत असून दुसरीकडे शहराती नागरिकांना हा अधिकार मिळविण्यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असून मोफत अर्जासाठीही चार रूपये मोजावे लागत असल्याची बाब पुढे आली आहे. 
निवडणुकांसाठी निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणी, नावांची दुरस्ती व वगळणी यासाठी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्याच अवघे दोनच दिवस उरल्याने इच्छुकांची धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी होत आहे. मात्र नवीन मतदार नोंदणीसाठीचे अर्जच संपल्याने झेरॉक्स दुकानावरून अर्ज  आणून जमा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना चार रूपये देऊन मतदान नोंदणी करावी लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत एका अधिकाºयाला विचारणा केली असता ७ हजार अर्जाचे वाटप झाले, आता पुन्हा अर्ज येणार नसल्याने बाहेरून अर्ज आणून नोंदणीचा सल्ला दिला जात आहे.  
धुळे शहरातील १९ प्रभागांसाठी २४९ बीएलओ नियुक्त करण्यात आले आहे़त. त्यांच्या मदतीने शहरात मतदार नोंदणी केली जात आहे़ धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातूनही नोंदणी करण्यात येत आहे़ धुळे ग्रामीण कार्यालयात आतापर्यत सहा हजार ६०० अर्ज नवीन मतदार नोंदणीसाठी तर  ४०० दुरस्तीसाठी अर्ज प्राप्त झाले. दरम्यान ३१ आॅक्टोबरपर्यत अर्ज जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़  

Web Title: 4 rupees have to be paid for voting rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे