४२ अतिक्रमणे भुईसपाट
By admin | Published: February 16, 2017 04:37 AM2017-02-16T04:37:11+5:302017-02-16T04:37:11+5:30
महापालिका प्रशासनाने बुधवारी जुने धुळे परिसरातील घरकूल योजनेच्या प्रस्तावित जागेवरील ५४ अतिक्रमित झोपड्या नागरिकांच्या
Next
धुळे : महापालिका प्रशासनाने बुधवारी जुने धुळे परिसरातील घरकूल योजनेच्या प्रस्तावित जागेवरील ५४ अतिक्रमित झोपड्या नागरिकांच्या सहाकार्याने हटविल्या. बहुतांश अतिक्रमण संबंधित नागरिकांनी स्वत:हून हटविले़ त्यामुळे रखडलेल्या घरकूल योजनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे़
जुने धुळे परिसरात मनपातर्फे एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत घरकूल योजना प्रस्तावित करण्यात आली आहे़ मात्र या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याने वाद निर्माण झाला होता़ (प्रतिनिधी)