तीन ट्रकांमधून लांबविले ४३ हजारांचे डिझेल महामार्गावरील घटना, पोलिसात गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: March 16, 2023 06:44 PM2023-03-16T18:44:49+5:302023-03-16T18:45:46+5:30
डिझेल लंपास झाल्याचा प्रकार लक्षात येताच चाळीसगाव रोड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
धुळे -मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल कुणाल शेजारी असलेल्या काशिनाथ ट्रान्सपोर्टच्या आवारात उभ्या असलेल्या तीन ट्रकमधून ४३ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरट्याने चोरून नेले आहे. डिझेल लंपास झाल्याचा प्रकार लक्षात येताच चाळीसगाव रोड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
अमित अशोक मंदान (वय ४०) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, १३ आणि १४ मार्च दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या काशिनाथ ट्रान्सपोर्टच्या आवारात त्यांच्या नावावरील तीन ट्रक उभे करण्यात आले होते. त्यात, एमएच १८ झेड ७७१६, एमएच १८ एएन ३७८९ क्रमांकाच्या ट्रकमधून प्रत्येकी १५ हजार रुपये किमतीचे डिझेल आणि वडील अशोक मंदान यांच्या नावे असलेल्या एमएच १८ एएफ ७७१६ क्रमांकाच्या ट्रकमघून १३ हजार रुपये किमतीचे डिझेल असे एकूण ४३ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरट्याने लंपास केल्याची बाब समोर आली आहे. डिझेल चोरीला गेल्याचे समोर येताच चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.