धुळे जिल्ह्यात अवकाळीमुळे ४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

By अतुल जोशी | Published: November 28, 2023 03:41 PM2023-11-28T15:41:49+5:302023-11-28T15:42:03+5:30

४ गुरे ठार, ९ घरे अंशत: पडल्याचे नमूद

46 hectare crop loss due to bad weather in Dhule district | धुळे जिल्ह्यात अवकाळीमुळे ४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

धुळे जिल्ह्यात अवकाळीमुळे ४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

अतुल जोशी, धुळे: जिल्ह्यात रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे ४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. जिल्ह्यात ४ गुरे ठार झालेली आहेत. तर ९ घरे अंशत: पडल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

धुळे जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारपासून काही ठिकाणी तुरळक सरी कोसळायला सुरूवात झाली. त्यानंतर अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यात जिल्हयातील साक्री तालुक्यातील १० व शिरपूर तालुक्यातील एक अशा एकूण ११ गावांमधील ४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात केळी, पपई व कपाशी पिकांचा समावेश आहे. या ११ गावातील बाधित शेतकऱ्यांची संख्या ८५ एवढी आहे.

Web Title: 46 hectare crop loss due to bad weather in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस